Novak Djokovic Dainik Gomantak
क्रीडा

Novak Djokovic wins French Open 2023: नोव्हाक जोकोविचने रचला इतिहास, फायनलमध्ये कॅस्पर रुडचा पराभव करुन जिंकले 23 वे ग्रँडस्लॅम

Novak Djokovic: 36 वर्षीय जोकोविच सर्वाधिक एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणारा टेनिसपटू ठरला आहे. विशेष म्हणजे, त्याने 23 वे ग्रॅंडस्लॅम जिंकले.

Manish Jadhav

Novak Djokovic Wins French Open 2023: फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत जोकोविचने (Novak Djokovic French Open 2023) नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करुन फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकले.

36 वर्षीय जोकोविच सर्वाधिक एकेरी ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणारा टेनिसपटू ठरला आहे. विशेष म्हणजे, त्याने 23 वे ग्रॅंडस्लॅम जिंकले.

दरम्यान, जोकोविचने स्पॅनिश खेळाडू राफेल नदालला (22 ग्रँडस्लॅम) मागे टाकले आहे. अंतिम सामन्यात जोकोविचने कॅस्पर रुडचा 7-6, 6-3, 7-5 असा पराभव करत तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. आता सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम नोव्हाकच्या नावावर आहे.

यापूर्वी, हा विक्रम राफेल नदालच्या नावावर होता. नदालने 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम केला. यानंतर रॉजर फेडरर (Roger Federer) तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.

अनुभवी जोकोविचने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद, 7 वेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावण्यात यश मिळवले आहे. तर फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनचे जेतेपद 3-3 वेळा जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT