Karim Benzema Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup फायनलनंतर फ्रान्सचा करिम बेंझेमा निवृत्त? 'त्या' ट्वीटने चर्चांना उधाण

फिफा वर्ल्डकपच्या फायनलनंतर बेंझेमाने केलेल्या ट्वीटची चर्चा होत आहे.

Pranali Kodre

Karim Benzema: फ्रान्सचा आणि रिअल मद्रीदचा प्रमुख खेळाडू करिम बेंझेमाने फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यानंतर एक ट्वीट केले आहे. त्यामुळे तो निवृत्ती घेतोय का, याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

बेंझेमाला दुखापतीमुळे फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत खेळता आले नव्हते. तरी त्याच्या अनुपस्थितीत फ्रान्सने अंतिम सामन्यापर्यंत धडक मारली होती. पण अंतिम सामन्यात फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे फ्रान्सचे सलग दोनदा विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले.

(Karim Benzema cryptic tweet)

दरम्यान, या अंतिम सामन्यानंतर बेंझेमाने ट्वीट केले की 'मी मेहनत घेतली, मी चूका केल्या आणि आज त्याचमुळे मी इथे आहे. मला याबद्दल अभिमान वाटत आहे. मी माझी गोष्ट लिहिली आणि आपली गोष्ट संपत आहे.'

त्याने हे ट्वीट फ्रेंच भाषेत केले आहे. पण त्याच्या या ट्वीटमुळे तो निवृत्ती घेत असल्याचे कयास लावले जात आहेत. नुकताच सोमवारी बेंझमाने 35 वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, त्याने जरी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून खरंच निवृत्ती घेतली असेल, तरी तो क्लब फुटबॉलमध्ये खेळत राहण्याची शक्यता दाट आहे.

बेंझेमाला वर्ल्डकपपूर्वी मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला वर्ल्डकपमध्ये फ्रान्सकडून एकही सामना खेळता आला नाही. पण आता तो दुखापतीतून सावरला असून सरावालाही त्याने सुरुवात केली आहे.

बेंझेमा यापूर्वी 2014 मध्ये फ्रान्सकडून वर्ल्डकपमध्ये खेळला आहे. त्यानंतर त्याला काही काळ काही वादग्रस्त घटनांमुळे राष्ट्रीय संघापासून दूर राहावे लागले होते. पण, त्यानंतर त्याने चांगले पुनरागमन केले होते. तो UEFA Euro स्पर्धेत 16 सामन्यांत 10 गोल केले होते.

बेंझेमाने फ्रान्ससाठी आत्तापर्यंत 97 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 37 गोल्स केले आहेत. त्याला यावर्षी ऑक्टोबरमध्येत बॅलन डी’ओर पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pankaj Dheer: महाभारतातील 'कर्ण' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

‘त्या’ स्वप्नाला मूर्त स्वरुप येण्यापूर्वीच 'पात्रांव रवी नाईक' यांनी जगाचा निरोप घेतला

'चाणक्य हरपला'! फोंड्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार; माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये शोककळा

Goa Today's News Live: सार्वजनिक सुट्टीमुळे दावर्ली पंचायत निवडणूक रद्द, उडाला गोंधळ

Footprints and Frames: मुंबई ते गोवा मार्गावरील कथा पहा चित्रांमध्ये! नॉस्टेल्जीयाच्या पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT