Brendon McCullum Dainik Gomantak
क्रीडा

'कॅप्टन तुमचा शिपाई नाही'...' प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमच्या कोचिंग टीका

पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने न्यूझीलंडचे ब्रेंडन मॅक्क्युलमच्या कोचिंग स्टाईलवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानचा (Pakistan) माजी कर्णधार सलमान बटने (Salman Butt) न्यूझीलंडचे ब्रेंडन मॅक्क्युलमच्या (Brendon McCullum) कोचिंग स्टाईलवर निशाणा साधला आहे. निडर क्रिकेटच्या नावाखाली माजी किवी खेळाडूंना ज्या प्रकारचे कोचिंग दिले जाते ते योग्य नाहीये, असेही ते म्हणाले. तसेच सलमान बट त्याच्या यूट्यूब चॅनलवर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत होता. यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला की कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) सध्याच्या प्रशिक्षकाकडे एकच मार्ग आहे, परिस्थिती काहीही असो, तो फक्त मैदानवर खेळणे. (Former Pakistan captain Salman Butt has hit out at New Zealand Brendon McCullum coaching style)

'ब्रेंडन मॅक्क्युलमकडे रणनीती नाहीये'

ब्रेंडन मॅक्क्युलमकडे प्रशिक्षक म्हणून फारसे पर्याय नाहीत, असे सलमान बटने सांगितले. मैदानावरील पीच कशी आहे, टीमचा स्कोर काय असायला हवा. परिस्थितीनुसार ब्रेंडन मॅक्क्युलमकडे रणनीती नाहीये. ब्रेंडन मॅक्युलमला इथे एवढेच सांगायचे आहे की प्रत्येकाने मुक्तपणे खेळा आणि वेगाने धावा करा.

त्याच वेळी, त्याने अशा कोचिंग शैलीला क्रिकेटच्या नावाखाली मूर्ख क्रिकेट म्हटले आहे. माजी पाकिस्तानी कर्णधाराला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्याबद्दल विचारले असता, तो म्हणाला की, कोच जे काही सांगतो त्याच्याशी कर्णधार सहमत असणे आवश्यकच नाही.

'कॅप्टन हा तुमचा शिपाई नाहीये, जो सर्व आदेश पाळेल'

एक संघ म्हणून तुमचा प्रयत्न हा जिंकण्यासाठीच हवा, असे सलमान बट म्हणाले. जेव्हा तुम्ही एखाद्याला कर्णधार बनवता तेव्हा त्याला चुका करण्याची देखील मुभा असते. त्याचबरोबर कॅप्टन हा तुमचा शिपाई नाही, जो तुमच्या सर्व आदेशांचे पालन करेल, असेही ते यावेळी म्हणाले. बट म्हणाले की, 2017 आणि 2108 मध्ये ब्रेंडन मॅक्युलम पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सचा कर्णधार देखीर राहिला होता.

पण त्या काळात लाहोर कलंदरची कामगिरी खूपच खराब राहिली होती. तसेच दोन्ही वर्षे लाहोर कलंदरच्या गुणतालिकेत तळाशी होती. ब्रेंडन मॅक्क्युलम सध्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) चे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मॅक्क्युलमची प्रशिक्षकपदी नियुक्ती केली. म्हणजेच आयपीएल 2022 चा हंगाम संपल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंड संघात सामील होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT