jeri 1.jpg
jeri 1.jpg 
क्रीडा

गोव्यातील माजी रणजी क्रिकेटपटू जेरी फर्नांडिस यांचे निधन

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोव्यातील (Goa) क्रिकेटमधील आणखी एक तारा निखळला आहे. रणजी करंडक क्रिकेट (Ranji Trophy cricket) स्पर्धेत एकत्रित खेळलेल्या संघातील फलंदाज प्रसाद आमोणकर (Prasad Amonkar) यांच्यानंतर माजी गोलंदाज जेरी फर्नांडिस (Jerry Fernandes) यांचे पर्वरी येथे निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी ते 57 वर्षांचे होते.

प्रसाद व जेरी गोव्यातर्फे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एकाच कालावधीत खेळले. 1988-89 ते 1994-95 या कालावधीत जेरी गोव्यातर्फे रणजी स्पर्धेत 9 सामने खेळले. त्यांनी एकूण 16 विकेट मिळविल्या, तर एका अर्धशतकासह (70) 162 धावा केल्या. एकदिवसीय प्रथम श्रेणी स्पर्धेतील 3 सामन्यांत त्यांनी 6 विकेट व 40 धावा अशी कामगिरी बजावली. (Former Goa Ranji cricketer Jerry Fernandes dies)

ते डावखुरे फलंदाज होते, डावखुरे मध्यमगती गोलंदाज असलेले जेरी वेळप्रसंगी डावखुरी फिरकी गोलंदाजीही टाकत असत. राज्य पातळीवरील स्पर्धांत त्यांनी पणजी जिमखाना व चौगुले स्पोर्टस क्लबचे प्रतिनिधित्व केले.

जेरी यांच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे (pune) येथे जन्मलेले जेरी गोव्यात बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये (Bank of Maharashtra) अधिकारीपदी कार्यरत होते. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता, तसेच मधूमेहही होता. त्यांचे निधन गुरुवारी झाले, राहत्या घरी ते एकटेच होते. अत्यवस्थावस्थेत आढळल्यानंतर त्यांना पोलिसांच्या मदतीने इस्पितळात दाखल करण्यात आले, पण त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी समजले. त्यांच्या मागे पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT