Cricketers Who fought Against Cancer Dainik Gomantak
क्रीडा

World Cancer Day: फक्त युवीच नाही, तर 'या' 5 क्रिकेटर्सनेही दिला कॅन्सरशी लढा

कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देणाऱ्या क्रिकेटपटूंबद्दल जाणून घ्या.

Pranali Kodre

World Cancer Day:

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा मोठमोठे कारनामे क्रिकेटपटू करत असतात. पण अशा क्रिकेटपटूंच्या आयुष्यातही काही चढ-उतार येतात. काहींना मोठ्या दुखापतींना सामोरे जावे लागते, तर काहींना जीवघेण्या आजाराशीही लढा द्यावा लागतो.

कर्करोग हा देखील असाच एक अजार आहे. कर्करोगाची लागण आत्तापर्यंत अनेक क्रिकेटपटूंनाही झाली आहे, त्यातील अनेकांनी धैर्याने या कर्करोगाला हरवत मैदानात पुनरागमनही केले. अशाच काही क्रिकेपटूंबद्दल जाणून घेऊ.

Yuvraj Singh

1. युवराज सिंग

भारताचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याला 2011 वर्ल्डकपनंतर फुफ्फुसाचा कर्करोगाचे निदान झाले होते. तो त्यानंतर उपचारासाठी युएसएलाही गेला होता. तिथे त्यावर उपचार केल्यानंतर तो परत आला आणि त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनही केले.

विशेष म्हणजे पुनरागमनानंतर त्याने 2017 साली त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोत्तम 150 धावांची खेळीही केली. तो 2014 सालचा टी20 वर्ल्डकप आणि 2017 सालची चॅम्पियन्स ट्रॉफीही खेळला.

Matthew Wade

2. मॅथ्यू वेड

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड याला तो 16 वर्षांचा असतानाच टेस्टिक्युलर कर्करोगाचे निदान झाले होते. याचे निदान लवकर झाल्याने त्याने लगेचच उपचार घेतले. दोन वर्षे यावर उपचार घेतल्यानंतर वेडने क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवली. तो आता ऑस्ट्रेलियन संघाचा प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे.

Michael Clarke

3. मायकल क्लार्क

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार मायकल क्लार्क 2006 साली त्वचेचा कर्करोग झाला होता. त्याच्या चेहऱ्यावर दोन मोठे डाग दिसत होते. त्यावेळी त्याने क्रिकेटमधून बराच काळ ब्रेक घेत यावर उपचार घेतले. त्याने नंतर पुन्हा क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले. महत्त्वाचे म्हणजे त्याने पुनरागमनानंतर ऑस्ट्रेलियाला 2015 साली त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपही जिंकून दिला.

Martin Crowe

4. मार्टिन क्रो

न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो यांना 2012 मध्ये फॉलिक्युलर लिम्फोमाचे निदान झाले होते. त्यावर त्यांनी उपचार घेतले. पण त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा त्यांना याच आजाराचे निदान झाले. अखेर त्यांची कर्करोगाविरुद्धची लढाई 2016 साली संपली. त्यांनी या आजाराशी झुंज देत अखेरचा श्वास घेतला.

Geoffrey Boycott

5. जेफ्री बॉयकॉट

इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट 62 वर्षांचे असताना 2002 साली त्यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यांनी त्यावर उपचार घेतले असून त्यांनी कर्करोगाविरुद्ध यशस्वी झुंज दिली. या रोगाला हरवत आजही ते आयुष्य चांगले जगत आहेत.

Robin Jackman

6. रॉबिन जॅकमन

माजी इंग्लंडचे क्रिकेटपटू आणि ब्रॉडकास्टर रॉबिन जॅकमन यांना स्वरयंत्राचा (Vocal Cords) कर्करोग झाला होता. त्यांनी त्यानंतर 7 आठवडे रेडिओथरपीचे उपचार घेतले. त्यातून त्यांनी कर्करोगाला हरवत पुन्हा 2012 मध्ये क्रिकेट ब्रॉडकास्टिंगमध्ये पुनरागमन केले होते.

Malcolm Marshall

7. माल्कम मार्शल

वेस्ट इंडिजचे दिग्गज वेगवान गोलंदाज माल्कम मार्शल यांना 1999 साली आतड्यांचा कर्करोग झाला होता. त्यांनी केमोथरपीही घेतली होती. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी नोव्हेंबर 1999 मध्ये अखेरचा श्वास घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT