I League 2: FC Goa win
I League 2: FC Goa win  Dainik Gomantak
क्रीडा

I-League 2: एफसी गोवाच्या खाती पहिला गुण; अंबरनाथ युनायटेडला रोखले बरोबरीत

किशोर पेटकर

I-League 2 FC Goa vs Ambarnath United: द्वितीय विभाग आय-लीग फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा डेव्हलपमेंट संघाने दोन पराभवानंतर पहिला गुण प्राप्त केला. नागोवा पंचायत मैदानावर गुरुवारी त्यांनी अंबरनाथ युनायटेड अटलांटा संघाला 3-3 असे गोलबरोबरीत रोखले.

स्पर्धेच्या ड गटात आता एफसी गोवाच्या खाती तीन लढतीनंतर एक गुण आहे. अंबरनाथ युनायटेडची ही दुसरी बरोबरी ठरली. त्यामुळे त्यांचे धेंपो स्पोर्टस क्लबइतकेच पाच गुण झाले आहेत.

एफसी गोवाने डेल्टन कुलासोच्या गोलमुळे नवव्या मिनिटास आघाडी घेतली. त्यानंतर दोन मिनिटांत दोन गोल नोंदवून अंबरनाथ संघाने वर्चस्व राखले. त्यांच्यासाठी हिमांशू पाटील याने 14व्या, तर अॅश्ली कोळी याने 16व्या मिनिटास गोल केला.

27 व्या मिनिटास जॉर्डन बोर्जिसच्या गोलमुळे एफसी गोवाने 2-2अशी गोलबरोबरी साधली. विश्रांतीनंतर 62 व्या मिनिटास आरिफ शेख याच्या गोलमुळे अंबरनाथ संघाने पुन्हा आघाडी प्राप्त केली, मात्र 75 व्या मिनिटास ब्रायसन परेराच्या गोलमुळे एफसी गोवाने 3-3 अशी बरोबरी साधली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa Demand High Court: गोव्यात स्वतंत्र उच्च न्यायालयाची मागणी; बार असोसिएशनचा ठराव

Harmal News : मांद्रे-जुनसवाडात पदपुलाचे पत्रे तुटले; लोखंडी पदपुलाची दुर्दशा

Goa Today's Live Update: गोव्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

Mapusa News : झोपडपट्ट्या कायदेशीर करणार : रमाकांत खलप

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीवर पाकिस्तानचं भाष्य; परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या म्हणाल्या, ''भारतीय राजकारण्यांनी...''

SCROLL FOR NEXT