Fight against Corona Great help from Rajasthan team to India
Fight against Corona Great help from Rajasthan team to India 
क्रीडा

कोरोनाशी लढा: राजस्थान संघाकडून भारताला मोठी मदत

गोमंतक वृत्तसेवा

भारतात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयावह परिस्थिती निर्माण होत चालली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यातच भारतात सुरु असलेल्या आयपीएलमधील (IPL) राजस्थान संघाने (Rajasthan Royal) या कोरोनाच्या संकटकाळात फाऊंडेशनच्या माध्यमातून 7.5 कोटी रुपये निधी जमा केला आहे. हा निधी रिलिफ फंडाला देण्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. (Fight against Corona Great help from Rajasthan team to India

देशभर कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने पिडीतांना तातडीने मदत मिळावी म्हणून हा निधी जमा करण्यात आला असल्याचे राजस्थान संघाकडून सांगण्यात आलं आहे. भारतात कोरोना संसर्ग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी देशात कोरोना संक्रमणाची 3,79,257 नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

‘’संघ मालकांनी आणि संघ व्यवस्थापनाने खेळांडूसोबत हा निधी गोळा केला आहे आणि ब्रिटीश एशियन ट्रस्टच्या कल्याणकारी संस्थाबरोबर संघ कार्यरत आहे,’’ असं फ्रेंचायझीने सांगितलं.

भारतातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्सने (Pat Cummins) 37 लाखांची मदत केली आहे. कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीने मदतीचा हात पुढे केला होता. त्याने ऑक्सिजन (Oxygen) पुरवठ्यासाठी जवळपास 42 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. कमिन्सने भारताच्या या कठिण काळात मदत करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना विनंती केली होती. या आवाहनानंतर ब्रेट लीने (Brett Lee) मदत केली होती.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT