Grant Wahl Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup: फीफा वर्ल्ड कप 2022 मध्ये पत्रकार निशाण्यावर ! कोणाला अटक तर...

FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक 2022 सुरु होऊन केवळ तीनच दिवस झाले आहेत. मात्र या दिवसांत कतारमधून पत्रकारांशी गैरवर्तन आणि चोरीच्या घटना समोर आल्या.

दैनिक गोमन्तक

Qatar FIFA World Cup 2022: FIFA विश्वचषक 2022 सुरु होऊन केवळ तीनच दिवस झाले आहेत. मात्र या दिवसांत कतारमधून पत्रकारांशी गैरवर्तन आणि चोरीच्या घटना समोर आल्या. या घटनांचे बळी अमेरिकन पत्रकार ग्रँट वाहल आणि अर्जेंटिनाची महिला रिपोर्टर डॉमिनिक मेट्झगर ठरले आहेत.

अमेरिकन पत्रकाराला अटक

कतारमधील (Qatar) अहमद बिन अली स्टेडियमवर सोमवारी रात्री उशिरा अमेरिका आणि वेल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यादरम्यान सुरक्षा कर्मचार्‍यांनी अमेरिकन पत्रकार ग्रँट वाहल याला आत जाण्यापासून रोखले. अमेरिकन पत्रकाराने रेनबो टी-शर्ट घातला होता, हा टी-शर्ट समलिंगी समुदायाला (LGBTQ समुदाय) समर्थन देण्यासाठी परिधान केला जातो. हा टी-शर्ट कतारच्या नियमांविरुद्ध होता, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

महिला पत्रकाराची पर्स चोरीला गेली

अर्जेंटिनाची (Argentina) महिला रिपोर्टर डॉमिनिक मेट्झगर लाइव्ह शो करत असताना तिच्या हँडबॅगमधून काही वस्तू चोरीला गेल्या. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जेव्हा डॉमिनिक मेट्झगरने पोलिसांना याची माहिती दिली तेव्हा तिथेही तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. तिने सांगितले की, या घटनेनंतर पोलिसांनी त्यांची फक्त चौकशी केली.

कतार पोलिसांनी गैरवर्तन केले

या घटनेबाबत बोलताना डॉमिनिक मेट्झगर (Dominique Metzger) म्हणाली की, 'जेव्हा मी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले तेव्हा माझ्यावर सांस्कृतिक भेदभाव झाला. महिला पोलीस कर्मचाऱ्याने मला सांगितले की, आमच्याकडे सर्वत्र हायटेक कॅमेरे आहेत आणि आम्ही त्याला (चोराचा) चेहरा ओळखून शोधणार आहोत. तुम्हाला कोणता न्याय हवा आहे?' याआधी एका डॅनिश पत्रकाराला त्याच्या चॅनलचे रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT