FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022 : अंतिम 8 संघ निश्चित! वाचा एका क्लिकवर क्वार्टर-फायनल्सचे संपूर्ण वेळापत्रक

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत 8 संघांनी प्रवेश केला असून 9 डिसेंबरपासून सामने सुरू होतील.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: कतारमध्ये सुरु असलेला फिफा वर्ल्डकप 2022 चा आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. या स्पर्धेतील साखळी फेरी आणि उपउपांत्यपूर्व फेरी संपली असून आता अंतिम 8 संघ मिळाले आहेत.

या स्पर्धेत जगभरातून एकूण 32 संघ सहभागी झाले होते. या संघांची चार-चार संघांच्या गटात विभागणी करण्यात आलेली. त्यामुळे एकूण 8 गटातून साखळी फेरीचे सामने खेळवण्यात आले होते. त्यातून 16 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरले. विशेष म्हणजे जर्मनी आणि बेल्जियम यांसारखे बलाढ्य संघ साखळी फेरीनंतर स्पर्धेतून बाहेर पडले.

त्यानंतर 16 संघांमध्ये उपउपांत्यपूर्व फेरी झाली आणि आता त्यातून अंतिम 8 संघ पुढे आले आहेत. उपउपांत्यपूर्व फेरीमध्येही अनेक रोमांचकारी सामने पाहायला मिळाले. या फेरीतही स्पेनसारख्या संघाला बाहेर व्हावे लागले.

दरम्यान आता, अर्जेंटिना, क्रोएशिया, ब्राझील, इंग्लंड, फ्रान्स, मोरोक्को, नेदरलँड्स आणि पोर्तुगाल हे 8 संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहेत. आता या 8 संघांमध्ये 9 डिसेंबरपासून उपांत्यपूर्व फेरीत सामने रंगतील. उपांत्यपूर्व फेरीचे संपूर्ण वेळापत्रकही समोर आले आहे.

उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवणारे चार संघ उपांत्य सामने खेळतील आणि मग त्यात विजय मिळणारे दोन संघ वर्ल्डकप ट्रॉफीसाठी दोन हात करतील. अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसैल स्टेडियमवर पार पडेल. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणारे दोन संघ तिसरा क्रमांक पटकावण्यासाठी एकमेकांविरुद्ध खेळतील.

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक -

9 डिसेंबर - क्रोएशिया विरुद्ध ब्राझील (वेळ - रात्री 8.30 वाजता)

10 डिसेंबर - नेदरलँड्स विरुद्ध अर्जेंटिना, (वेळ - मध्यरात्री 12.30 वाजता)

10 डिसेंबर - मोरोक्को विरुद्ध पोर्तुगाल (वेळ - रात्री 8.30 वाजता)

11 डिसेंबर - इंग्लंड विरुद्ध फ्रान्स (वेळ - मध्यरात्री 12.30 वाजता)

उपांत्य फेरी -

14 डिसेंबर - पहिला उपांत्य सामना, (वेळ - मध्यरात्री 12.30 वाजता)

15 डिसेंबर - दुसरा उपांत्य सामना, (वेळ - मध्यरात्री 12.30 वाजता)

17 डिसेंबर - तिसऱ्या क्रमांकासाठी सामना (वेळ - रात्री 8.30 वाजता)

18 डिसेंबर - अंतिम सामना (वेळ - रात्री 8.30 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT