Lionel Messi and Neymar | FIFA World Cup 2022 | FIFA 2022 | FIFA World Cup News Updates  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: आज नेमार-मेस्सी ऍक्शनमध्ये! जाणून घ्या क्वार्टर-फायलन सामन्यांबद्दल

फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीतील दोन सामने रंगणार आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत शुक्रवारपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने रंगणार आहेत. पाचवेळचे वर्ल्डकप विजेते ब्राझील विरुद्ध गतउपविजेते क्रोएशिया यांच्यात या फेरीतील पहिला सामना होईल. तसेच अर्जेंटिना विरुद्ध नेदरलँड्स संघात दुसरा सामना होईल. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत या वर्ल्डकपमधील अंतिम 4 संघांतील दोन संघ मिळतील.

दरम्यान, क्रोएशिया संघाने यंदा समाधानकारक कामगिरी केली आहे. क्रोएशियाने उपउपांत्यपूर्व फेरीत पेनल्टी शुटआऊटमध्ये जपानला पराभूत केले होते आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

दरम्यान ते अजूनही त्यांच्या लुका मॉड्रिक, मार्सेलो ब्रोझोविक आणि मतेओ कोवासिक यांच्यावर अधिक भर आहे. तरी त्यांचा गोलरक्षक डॉमनिक लिवाकोविकवरही लक्ष असेल. त्याने जपानविरुद्ध पेनल्टी शुटआऊटमध्ये तीन गोल वाचवले होते.

तसेच ब्राझीलच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, त्यांचा फॉर्म चांगला असून त्यांनी दक्षिण कोरियाला उपउपांत्यपूर्व फेरीत 4-1 अशा फरकाने धूळ चारली आहे. ब्राझीलचा प्रमुख खेळाडू नेमारने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. ही संघासाठी सकारात्मक बाब आहे. त्याचबरोबर रिचार्लिसन देखील तुफान फॉर्ममध्ये आहे. ज्याचा फायदा ब्राझीलला होऊ शकतो.

तसेच या सामन्यांत ब्राझीलच्या कॅसमिरो विरुद्ध क्रोएशियाच्या लुका मॉड्रिक यांच्यातील चढाओढ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकते. हे दोघेही रिएल मद्रीदकडून एकत्र खेळतात.

ब्राझील आणि क्रोएशिया आत्तापर्यंत 5 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यात एकदाही ब्राझीलने पराभव स्विकारलेला नाही. ब्राझीलने 3 सामने जिंकले आहेत, तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत. दरम्यान ब्राझील आणि क्रोएशिया यांच्यातील सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8.30 वाजता चालू होईल.

शुक्रवारी होणारा दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सर्वांचेच लक्ष अर्जेंटिनाच्या लिओनल मेस्सीवर असेल. त्याने या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी केली असून 3 गोल नोंदवले आहेत. त्यामुळे तो नेदरलँड्सविरुद्ध कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच नेदरलँड्सचा मेंफिस डिपेची कामगिरी देखील त्याच्या संघासाठी या सामन्यात महत्त्वाची ठरू शकते.

अर्जेंटिनाने उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाला 2-1 अशा फरकाने पराभूत केले आहे. दरम्यान उपांत्यपूर्व सामन्यांत चांगल्या लयीत खेळणाऱ्या अर्जेंटिनाला नेदरलँड्सचे तोडीस तोड आव्हान मिळू शकते. कारण नेदरलँड्सनेही या स्पर्धेत चांगला खेळ केला आहे. त्यांनी उपउपांत्यपूर्व अमेरिकेला 3-1 ने मात दिली होती.

वर्ल्डकपमध्ये येण्याच्या आधीपासूनच हे दोन्ही संघ चांगल्या फॉर्ममध्ये होते. नेदरलँड्स सप्टेंबर 2021 पासून 19 सामन्यांपैकी 14 सामने जिंकले आहेत. तसेच अर्जेंटिनाही फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये सलग 36 सामन्यात अपराजीत राहण्याच्या विक्रमासह उतरले होते. तसेच हे दोन संघ जेव्हा शेवटचे दोनदा आमने-सामने आले होते, तेव्हा दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध गोल करण्यात अपयश आले होते.

त्यामुळे दोन संघात अनेकदा रोमांचक लढती आजपर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना शुक्रवारी रात्रीही अशाच लढतीची अपेक्षा असणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 12.30 वाजता होणार आहे.

आता शुक्रवारी जे दोन संघ विजयी होतील, ते उपांत्य सामन्यात आमने-सामने येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT