Argentina  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup चे विजेते-उपविजेते मालामाल! अर्जेंटिना-फ्रान्सला मिळाले 'इतक्या' कोटींचे बक्षीस

फिफा वर्ल्डकमध्ये विजेत्या आणि उपविजेत्या संघांना कोटींमध्ये बक्षीस रक्कम मिळाली आहे.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप २०२२ स्पर्धेची सांगता रविवारी झाली. लुसैल स्टेडियमवर अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शुटआऊटमध्ये ४-२ फरकाने विजय मिळवत ३६ वर्षानंतर विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. दरम्यान, विजेत्या आणि उपविजेत्या संघाला मोठ्या रकमेचे बक्षीसही या सामन्यानंतर देण्यात आले.

फुटबॉल जगभरातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. जगभरातील जवळपास सर्वच देशात फुटबॉल खेळला जातो. त्यामुळे कतारमध्ये झालेल्या फिफा वर्ल्डकपवर सर्वांचेच लक्ष होते. जवळपास महिनाभर झालेल्या या स्पर्धेचे विजेतेपद अर्जेंटिनाच्या गळ्यात पडले.

(FIFA World Cup 2022 prize money)

दरम्यान, फिफाने या वर्ल्डकपसाठी जवळपास ३६४१ कोटी रुपये खर्च केले आहेत. हे पैसे विविध संघांच्या बक्षीस रकमेत, मॅच फी, गोल फी यात खर्च करण्यात आलेली आहे. दरम्यान विजेता संघ अर्जेंटिनाला जवळपास ३४७ कोटी रुपयांचे बक्षीस रक्कम देण्यात आली आहे.

तसेच उपविजेत्या फ्रान्सला जवळपास २४८ कोटी रुपयांचे बक्षीस रक्कम देण्यात आली. तसेच तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या क्रोएशियाला २३३ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावरील मोरोक्कोला २०६ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली आहे.

इतकंच नाही, तर बाद फेरीत पोहोचलेल्या आणि वर्ल्डकपमध्ये सहभागी झालेल्या संघांनाही बक्षीस रक्कम देण्यात आली आहे. वर्ल्डकपमध्ये सामील झालेल्या प्रत्येक संघाला ९ मिलियन डॉलर मिळाले आहेत. तसेच उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या संघांना १३ मिलियन डॉलर, उपांत्यपूर्व फेरीत पोहचलेल्या संघांना १७ मिलियन डॉलर देण्यात आले आहेत.

एकूणच फिफा वर्ल्डकपमध्ये सामील झालेल्या प्रत्येक संघाला बक्षीस म्हणून मोठी रक्कम देण्यात आलेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT