Cristiano Ronaldo Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: रोनाल्डो उतरणार मैदानात, पाचव्या दिवसाच्या सामन्यांचे वेळापत्रक वाचा एका क्लिकवर

फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 मध्ये पाचव्या दिवशी ख्रिस्तियानो रोनाल्डो पोर्तुगालकडून खेळताना दिसणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

FIFA World Cup 2022: कतारमध्ये फिफा फुलबॉल वर्ल्डकपचा थरार सुरु असून गुरुवारी म्हणजेच स्पर्धेच्या 5 व्या दिवशीही रोमांचक सामने पाहायला मिळण्याची चाहत्यांना अपेक्षा आहे. गुरुवारी स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोही मैदानात उतरणार आहे. दरम्यान पाचव्या दिवशी कोणकोणते सामने होणार जाणून घेऊ.

स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून

पाचव्या दिवसातील पहिला सामना ग्रुप जी मधील स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून संघात होणार आहे. हा सामना अल जानोब स्टेडियम येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. या सामन्यात कॅमरुनचे आक्रमण विरुद्ध स्वित्झर्लंडचा बचाव अशी लढत पाहायला मिळू शकते. यापूर्वी हे दोन्ही संघ एकदाही आमने-सामने आले नाहीत, त्यामुळे ते पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत.

उरुग्वे विरुद्ध कोरिया रिपब्लिक

गुरुवारी दुसरा सामना उरुग्वे विरुद्ध कोरिया रिपब्लिक संघात होईल. एज्युकेशन सिटी स्टेजियम येथे होणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होईल. हा ग्रुप एचमधील सामना आहे. याआधी हे दोन संघ दोन वेळा आमने-सामने आले होते आणि या दोन्ही सामन्यांत उरुग्वेने विजय मिळवलेला.

कोरियाचा सन ह्युंग-मिन हा त्याच्यावर डाव्या डोळ्याजवळ झालेल्या शस्त्रक्रियेमुळे या सामन्यात मास्कसह खेळताना दिसेल. दरम्यान, उरुग्वे स्पर्धेत डार्क हॉर्स म्हणून सामील झाले आहेत. तसेच त्यांच्या संघात अनेक अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे.

पोर्तुगाल विरुद्ध घाना

ग्रुप एफ मधीलच पोर्तुगाल विरुद्ध घाना संघात पाचव्या दिवसातील तिसरा सामना होणार आहे. दरम्यान, या सामन्यात रोनाल्डो (Cristiano Ronaldo) मैदानात खेळताना दिसणार असल्याने सर्वांचेच सामन्यावर लक्ष असणार आहे.

हा सामना स्टेडियम 974 येथे होणार आहे. तसेच भारतीय प्रमाणवेळेनुसार सामन्याला रात्री 9.30 वाजता सुरुवात होईल. यापूर्वी हे दोन संघ एकदाच एकमेकांना भिडले असून त्यात पोर्तुगालने विजय मिळवला होता.

ब्राझील विरुद्ध सर्बिया

गुरुवारी रात्री उशीरा 12.30 वाजता ब्राझील विरुद्ध सर्बिया यांच्यातील सामना रंगेल. ग्रुप जी मधील हा सामना लुसेल स्टेडियमवर होणार असून हा सामनाही रोमांचक होण्याची अपेक्षा चाहत्यांना आहे. यापूर्वी हे दोन संघ 5 वेळा आमने-सामने आले होते. त्यातील 2 सामने ब्राझीलने जिंकले असून 1 सामने सर्बियाने जिंकला आहे. तसेच 2 सामने बरोबरीत सुटले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT