Serbia Dainik Gomantak
क्रीडा

Cameroon vs Serbia: कॅमरून-सर्बिया सामन्यात बरोबरी, दोन्ही संघांचे उघडले गुणांचे खाते

फिफा वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील कॅमरून विरुद्ध सर्बिया यांच्यात 3-3 अशी बरोबरी झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

Cameroon vs Serbia: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेत सोमवारी पहिला सामना ग्रुप जीमधील कॅमरून विरुद्ध सर्बिया संघात झाला. अल जनौब स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 3-3 अशा गोलफरकाने बरोबरी झाली. त्यामुळे आता या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला असून त्यांच्यावर आता स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे.

दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता, त्यामुळे दोन्ही संघ त्याच त्वेषाने सामन्यात खेळताना दिसले. तरी सर्बियाचा चेंडूवर 60 टक्के ताबा होता आणि पासेसची अचूकताही 81 टक्के होती. मात्र, असे असतानाही कॅमरूनने त्यांना तोडीची झुंज दिली.

विशेष म्हणजे कॅमरुनकडून (Cameroon) जीन-चार्ल्स कॅस्टेलेटोने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. पण पहिल्या हाफच्या अखेरीस दोन मिनिटांच्या अंतरात सर्बियाकडून स्ट्रहिंजा पावलोविक आणि सर्गेज मिलिन्कोविक-सॅविक यांनी प्रत्येकी एक गोल करत सर्बियाला आघाडीवर नेले.

पहिल्या हाफप्रमाणेच दुसरा हाफही रोमांचक राहिला. सर्बियाकडून (Serbia) दुसऱ्या हाफमध्ये अलेक्झांडर मिट्रोव्हिकने 53 व्या मिनिटालाच तिसरा गोल केला. त्यामुळे सर्बिया 3-1 अशा भक्कम आघाडीसह पुढे होते.

मात्र, त्यांना ही आघाडी टिकवता आली नाही. कारण 63 व्या मिनिटाला व्हिन्सेंट अबुबाकरने आणि 66 व्या मिनिटाला एरिक मॅक्सिम चौपो-मोटिंगने गोल करत कॅमरुनला बरोबरीत आणले. यानंतर मात्र, दोन्ही संघांनी एकमेकांना गोल करू दिला नाही. त्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

आता गोलफरकाच्या आधारावर ग्रुप जी मध्ये कॅमरून एक पराभव आणि एक बरोबरीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर सर्बियाही एक पराभव आणि एक बरोबरीसह चौथ्या क्रमांकावर आहे.

या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर ब्राझील आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लँड आहे. या दोन्ही संघांकडे प्रत्येकी 3 गुण आहेत. तसेच त्यांचे अद्याप दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ बाद फेरीत पोहचण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT