FIFA World Cup 2022 Memes Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup 2022: थरारक फायनलनंतर नेटीझन्स सुसाट, भन्नाट मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस

फिफा वर्ल्डकप २०२२ स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर मीम्स मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले.

Pranali Kodre

FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेचा अंतिम सामना अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स संघात पार पडला. कतारमधील लुसैल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शुटआऊटमध्ये विजय मिळवला. अर्जेंटिनाच्या या विजयानंतर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

या सामन्यात अर्जेंटिनाने पहिल्या हाफमध्ये पूर्ण वर्चस्व ठेवले होते. अर्जेंटिनाकडून 23 व्या मिनिटालाच कर्णधार लिओनल मेस्सीने पहिला गोलही केला होता. त्यानंतर 36 व्या मिनिटाला एंजेल डी मारियाने गोल करत अर्जेंटिनाची आघाडी 2-0 अशी वाढवली होती.

मात्र, दुसऱ्या हाफला संपण्यात 10 मिनिटे बाकी असतानाच फ्रान्सकडून 23 वर्षीय एमबाप्पेने 97 सेकंदाच्या आत दोन गोल केले आणि आपल्या संघाला सामन्यात परत आणले. इतकेच नाही, तर या सामन्यात निर्धारित वेळेनंतर 2-2 ची बरोबरी झाल्याने ज्यादाचा वेळही वाढवण्यात आला होता. यात मेस्सी आणि एमबाप्पेने प्रत्येकी 1 गोल केला.

त्यामुळे पुन्हा एकदा सामना 120 मिनिटाच्या पूर्ण खेळानंतर 3-3 अशा बरोबरीवर थांबला. त्यामुळे अखेर सामन्यात पेनल्टी शुटआऊट घेण्यात आले. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमी मार्टिनेझची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने फ्रान्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संधीतील गोल रोखले. त्यामुळे अर्जेंटिनाला विजय मिळवणे सोपे गेले.

अर्जेंटिनाकडून पेनल्टी शुटआऊटमध्ये मेस्सी, डायबाला, पॅरेडेस आणि माँटिएल यांनी अचूक गोल नोंदवले, तर फ्रान्सकडून केवळ एमबाप्पे आणि कॉलो मुआनीलाच मार्टिनेझविरुद्ध गोल करता आला. त्यामुळे अर्जेंटिनाने या विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले.

दरम्यान, अंतिम सामन्यानंतर अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले.

अर्जेंटिनाने तब्बल 36 वर्षांनंतर विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. यापूर्वी त्यांनी 1986 साली विश्वविजेतेपद जिंकले होते. तसेच त्यापूर्वी सर्वात आधी 1978 साली अर्जेंटिना विश्वविजेते ठरले होते. त्यामुळे यंदाचा अर्जेंटिनाचा हा तिसराच विश्वविजय आहे.

यापूर्वी तीन किंवा त्यापेक्षा अधिक विश्वविजेतेपद ब्राझील, जर्मनी आणि इटली यांनाच जिंकता आलेले आहे. ब्राझीलने 5 वेळा आणि जर्मनी व इटलीने प्रत्येकी 4 वेळा वर्ल्डकप विजयाचा मान मिळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT