UEFA dainikgomantak
क्रीडा

Russia Ukraine war: फिफा विश्वचषकातून रशियाची हकालपट्टी

Russia Ukraine war: फिफा विश्वचषकातून रशियाची हकालपट्टी, ऑलिम्पिकमधूनही पत्ताकट होण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : युक्रेनवर हल्ला केल्यावरून रशियाला (Russia vs Ukraine) जगापासून वेगळे करण्याची मोहीम सुरू झाली आहे. क्रीडा जगताने तर रशियाविरुद्ध कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. फिफा (FIFA) आणि युरोपियन फुटबॉल फेडरेशन (UEFA) या जगातील सर्वात मोठी फुटबॉल संघटनांनी रशियावर बंदी घातल फिफा विश्वचषकातून रशियाची हकालपट्टी केली आहे. तर यामुळे रशियाचा ऑलिम्पिकमधूनही पत्ताकट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(FIFA and UEFA suspend Russian clubs and national teams from all competitions)

या वर्षाच्या अखेरीस कतार येथे होणाऱ्या फुटबॉल विश्वचषकातून रशियाला (Russia)वगळण्यात आले असून जगभरात होणाऱ्या प्रत्येक स्पर्धा आणि चॅम्पियनशिपमध्ये ही भाग घेण्यास रशियन फुटबॉल क्लबवर बंदी घालण्यात आली आहे. रशियन क्लब स्पोर्ट्स मॉस्कोलाही युरोपियन लीगमधून बाहेर काढण्यात आल्याचे युईएफएने (UEFA) एक निवेदनाव्दारे जारी केले आहे. याचा अर्थ आरबी लीपझिंग थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

तसेच एका निवेदनात फिफा (FIFA) ने म्हटले आहे की, आम्ही युक्रेनमध्ये (Ukraine) बाधित झालेल्या लोकांसोबत मजबूतीने उभे आहोत. युक्रेनमधील परिस्थिती लवकरच सुधारेल आणि फुटबॉल पुन्हा एकदा लोकांमध्ये एकता आणि शांततेचा प्रतिक बनेल, अशी आशा फिफाने व्यक्त केली. याचबरोबर IOC ने व्लादिमीर पुतिन यांना 2011 मध्ये दिलेला 'ऑलिम्पिक ऑर्डर हा सन्मान ही मागे घेतला आहे. त्यानंतर इतर रशियन अधिकाऱ्यांना दिलेला सन्मानही काढून घेण्यात आला आहे.

इतर देशांचा खेळण्यास नकार

24 मार्च रोजी रशियाची राजधानी मॉस्को (Moscow) येथे विश्वचषक पात्रता फेरीचा प्लेऑफ खेळला जाणार होता. मात्र युक्रेनवर हल्ला केल्यावरून पोलंडने आधीच ठरलेल्या या सामन्यात खेळण्यास नकार दिला. पोलंडशिवाय स्वीडन आणि झेक प्रजासत्ताक यांनीही रशियाविरुद्ध आपले संघ मैदानात उतरवणार नसल्याचे सांगितले आहे. तर जुलैमध्ये महिला संघाचा सामना ही होणार होता. ज्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या युरोपियन चॅम्पियनशिपसाठी त्यांनी पात्रता फेरीसाठी दावा केला असता.

यापूर्वीच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनेही (International Olympic committee) रशियावर बंदी घालण्याची शिफारस केली होती. IOA ने म्हटले आहे की 'जागतिक क्रीडा स्पर्धांच्या अखंडतेचे आणि सर्व सहभागींच्या सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी' असे करणे आवश्यक आहे. आयओसीचे आवाहन बेलारूसमधील खेळाडू आणि अधिकाऱ्यांनाही लागू होते, जे रशियाच्या हल्ल्याला पाठिंबा देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT