ISL Football Tournament Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football Tournament : 'एफसी गोवा'ने ओडिशाला नमवले; 'नोआची' खेळी ठरली निर्णायक

दैनिक गोमंतक

पणजी : एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी ओडिशा एफसीविरुद्ध सामन्याच्या पूर्वसंध्येला फातोर्ड्यात आपल्या संघासाठी काहीही शक्य असल्याचा केलेला दावा शनिवारी त्यांच्या खेळाडूंनी सिद्ध करून दाखविला. सलग दोन पराभवानंतर यजमान संघाने 3-0 असा विजय नोंदवून इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील कामगिरी सुधारली.

(FC Goa's performance improved in the Indian Super League football tournament)

सामन्याच्या 65 व्या मिनिटास ओडिशाचा फॉर्ममधील खेळाडू नंधकुमार सेकर याला सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाले, परिणामी रेड कार्डसह त्याला मैदान सोडावे लागले व पाहुण्या संघाचे सामर्थ्य 10 खेळाडूंवर आले. एफसी गोवाने संधी साधली. महत्त्वाची बाब म्हणजे, अगोदरच्या लढतीतील चुका पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने टाळल्या, तसेच निलंबनामुळे खेळू न शकलेल्या एदू बेदियाची अनुपस्थितीत प्रकर्षाने जाणवू दिली नाही.

नोआ याचा बहारदार खेळ

मोरोक्कन नोआ सादावी याच्या बहारदार खेळाच्या बळावर अखेरच्या 16 मिनिटांत तीन गोल करून एफसी गोवाने पूर्ण तीन गुणांची कमाई केली. बदली खेळाडू ब्रायसन फर्नांडिसने 74 व्या मिनिटास नोआ याच्या असिस्टवर गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली, नंतर नोआ याने 78 व्या मिनिटास शानदार गोल केला, तर त्याच्या असिस्टवर आणखी एक बदली खेळाडू स्पॅनिश अल्वारो वाझकेझ याने 90 व्या मिनिटास संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एक गोल व दोन असिस्ट ही नोआची कामगिरी एफसी गोवाच्या विजयात निर्णायक ठरली.

घरच्या मैदानावर प्रभावी

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर एफसी गोवाने मोसमात तिसऱ्यांदा 3-0 फरकाने विजय मिळविला. यापूर्वी त्यांनी या मैदानावर जमशेदपूर एफसी व एटीके मोहन बागानला 3 गोलने नमविले होते. मात्र नंतरच्या लढतीत त्यांना बंगळूरकडून पराभव पत्करावा लागला.

मुंबईत मुंबई सिटीने धुव्वा उडविला. सलग दोन सामने गमावल्यानंतर एफसी गोवाने पुन्हा विजयाची चव चाखली. त्यांचा हा नऊ सामन्यातील पाचवा विजय ठरला. 15 गुणांसह ते पाचव्या स्थानी आले. गोलसरासरीत त्यांनी केरळा ब्लास्टर्सला मागे टाकले.

एफसी गोवाचा पुढील सामना फातोर्ड्यात नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध 17 रोजी होईल. सलग तीन सामने जिंकल्यानंतर ओडिशा एफसी पराभूत झाला. स्पर्धेतील तिसऱ्या पराभवामुळे त्यांचे नऊ लढतीनंतर 18 गुण आणि चौथा क्रमांक कायम राहिला.

  • ओडिशाविरुद्ध 7 लढती एफसी गोवा अपराजित, 5 विजय व 2 बरोबरी

  • नोआ सादावीचे मोसमात 5 गोल, 3 असिस्ट

  • यंदा ब्रायसन फर्नांडिसचे 2 व अल्वारो वाझकेझ याचा 1 गोल

  • फातोर्ड्यात एफसी गोवाचे यंदा 3 विजय, 1 पराभव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT