ISL Football Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एफसी गोवाची नजर पूर्ण गुणांवर; प्ले ऑफ फेरीत खेळण्याबाबत आशावादी...

किशोर पेटकर

Indian Super League Football: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या प्ले-ऑफ फेरीत खेळण्याबाबत आशावादी असलेल्या एफसी गोवा संघाला गुरुवारी (ता. 26) आणखी एक चांगली संधी असेल. स्पर्धेत विशेष सूर न गवसलेल्या ईस्ट बंगालला नमविल्यास गोव्यातील संघ गुणतक्त्यातील प्रगती कायम राखेल.

एफसी गोवा व ईस्ट बंगाल यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. एफसी गोवाने मागील लढतीत घरच्या मैदानावर केरळा ब्लास्टर्सला 3-1 असे हरवून प्ले-ऑफ फेरीच्या आशा कायम राखल्या. गुरुवारी पुन्हा पूर्ण तीन गुण मिळाले, तर त्यांना 26 गुणांसह तिसरा क्रमांक मिळेल.

एफसी गोवा संघ सध्या 23 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. ईस्ट बंगालने 14 पैकी 10 सामने गमावले असून 12 गुणांसह नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे आव्हान साखळी फेरीत आटोपल्यात जमा आहे. आपला संघ गोव्यात प्रतिष्ठा जपण्यासाठी खेळणार असल्याचे ईस्ट बंगालचे प्रशिक्षक स्टीफन कॉस्टंटाईन यांनी नमूद केले.

मागील विजयाने आत्मविश्वास उंचावला ः पेनया

केरळा ब्लास्टर्सविरुद्धचा विजय महत्त्वाचा होता. त्यामुळे आमचा आत्मविश्वास जागवला आहे. सकारात्मक मानसिकताही तयार झाली आहे, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘‘आम्ही नेहमीच चांगला खेळ केला, पण हल्लीच्या काही निकालांत ते दिसून आले नाही.

केवळ प्रेरित होण्यासाठी नव्हे, तर प्ले-ऑफ फेरीचा दावा कायम ठेवण्यासाठी आम्हाला मागील लढतीत विजय हवा होता. आता ईस्ट बंगालविरुद्धचा सामनाही विजय हवाच या धर्तीवरील आहे, तरीही आम्ही त्यांना कमी लेखलेले नाही,’’ असे पेनया म्हणाले.

लेनी रॉड्रिग्ज शैलीशी परिचित

एफसी गोवाच्या ग्लेन मार्टिन्सने संघ सोडला असून तो एटीके मोहन बागान संघात दाखल झाला. त्याची जागा आता लेनी रॉड्रिग्ज घेतली आहे. याविषयी पेनया म्हणाले, की ‘‘संघ सोडणाऱ्या ग्लेनला आम्ही रोखले नाही. लेनीला संघात आणण्यात आम्हाला यश मिळाले व तो आता निवडीसाठी उपलब्ध आहे. एफसी गोवा संघात मी लेनीसमवेत खेळाडू या नात्याने खेळलो आहे. तो आमच्या शैलीशी परिचित असून त्यामुळे त्याच्याशी केलेला करार उपयुक्त ठरेल.’’

मैदानात उतरण्यापूर्वी...

- पहिल्या टप्प्यात 12 ऑक्टोबर 2022 रोजी कोलकाता येथे एफसी गोवा 2-1 फरकाने विजयी

- एकमेकांविरुद्ध 5 आयएसएल सामने, एफसी गोवाचे 2, ईस्ट बंगालचा 1 विजय, 2 बरोबरी

- स्पर्धेत एफसी गोवाचे 26, तर ईस्ट बंगालचे 15 गोल

- एफसी गोवाचे स्पर्धेत 7 विजय, 2 बरोबरी, 6 पराभव

- स्पर्धेत ईस्ट बंगालचे 4 विजय, 10 पराभव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mopa Airport: ‘मोपा’मुळे दक्षिणेतील पर्यटनाचा विचका; व्‍यवसाय घटल्याने व्‍यावसायिक चिंतेत

Goa Tourism: परदेशी पावलं गोव्याच्या दिशेने वळणार; यंदा विदेशी पर्यटकांची संख्या वाढणार

Pitrupaksha 2024: श्राद्ध आणि महालय यात फरक आहे का? सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

Ponda Crime: संसार सोडून 'त्या' दोघी गोव्यात, कारमधून आलेल्या तरुणांनी केलं अपहरण; तपासात उघड झाला चक्रावून टाकणारा घटनाक्रम

Goa Tourism: परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचं खास प्लॅनिंग; कोविड नंतर आकड्यात झालीये का वाढ?

SCROLL FOR NEXT