FC Goa
FC Goa Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाच्या मोहिमेचा विजयी समारोप

किशोर पेटकर

पणजी : सामन्यातील शेवटच्या तेरा मिनिटांत दोन गोल नोंदवून एफसी गोवाने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेतील मोहिमेचा विजयी समारोप केला. नागोवा येथील मैदानावर त्यांनी बुधवारी आरएफ यंग चँप्सवर 2-0 फरकाने मात केली.

यंग चँप्सने पूर्वार्धात एफसी गोवास चांगलेच झुंजविले, नंतर उत्तरार्धातही त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना दाद दिली नाही. मात्र अखेरच्या टप्प्यातील खेळात एफसी गोवाने मुसंडी मारली. पूर्वार्धात संधी हुकलेल्या रायन मिनेझिसने 77 व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. त्यानंतर 88 व्या मिनिटास जोव्हियल डायस याने एफसी गोवाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

एफसी गोवाचा हा सात लढतीतील चौथा विजय ठरला. त्यांचे 13 गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. यंग चँप्सला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे सात लढतीनंतर त्यांचे सात गुण कायम राहिले.

डेव्हलपमेंट लीग स्पर्धेत बंगळूर एफसी आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यातील शेवटच्या साखळी सामन्यानंतर गुरुवारी (12 मे) विजेता संघ निश्चित होईल. सामना बाणावली येथे खेळला जाईल. सध्या प्रत्येकी सहा सामने खेळल्यानंतर बंगळूरचे 18 गुण, तर केरळा ब्लास्टर्सचे 15 गुण आहे. सहाही सामने जिंकलेल्या बंगळूरला गुरुवारी विजेतेपदासाठी बरोबरीचा गुण पुरेसा असेल. केरळा ब्लास्टर्सने विजय मिळविल्यास दोन्ही संघांचे समान 18 गुण होतील. सध्या बंगळूरची +15, तर केरळा ब्लास्टर्सची +8 गोलसरासरी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco News : सहा नद्यांचे राष्ट्रीयीकरण कोळशासाठी : कॅ. विरियातो फर्नांडिस

Cashew Farmer : निवडणुकीच्या धामधुमीत काजू उत्‍पादक वाऱ्यावर; उत्पादन कमी १६ हजार जणांना फटक

Heavy Rainfall in UAE: मुसळधार पाऊस अन् जोरदार वादळाने UAE पुन्हा बेहाल; उड्डाणे रद्द, इंटरसिटी बस सेवाही ठप्प

Loksabha Election 2024 : शिरोडा मतदारसंघातून धेंपेंना मताधिक्य देणार : मंत्री सुभाष शिरोडकर

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

SCROLL FOR NEXT