Indian Super League Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: FC गोवाची प्रतिष्ठा पणाला; मोहन बागानविरुद्ध उद्या भिडणार!

पणजी: मोहन बागान सुपर जायंट्सला नमवल्यास एफसी गोवाचे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान भक्कम होईल.

किशोर पेटकर

पणजी: मोहन बागान सुपर जायंट्सला नमवल्यास एफसी गोवाचे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील अग्रस्थान भक्कम होईल. या उद्दिष्टपूर्तीसाठी मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ शनिवारी (ता. 23) कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणवर उतरेल. एफसी गोवा सध्या स्पर्धेत सलग आठ सामने अपराजित आहे. सहा विजय आणि दोन बरोबरीमुळे त्यांचे 20 गुण झाले आहेत. केरळा ब्लास्टर्सचेही 10 सामन्यांतून तेवढेच गुण झाले आहेत. मात्र गोव्यातील संघाची गोलसरासरी सरस असल्याने ते अव्वल स्थानी आहेत.

दरम्यान, हुआन फेर्रांडो यांच्या मार्गदर्शनाखालील संघही मुंबई सिटीविरुद्धचा मागील पराभव विसरुन घरच्या मैदानावर पूर्ण तीन गुणांसाठी प्रयत्नशील असेल. आक्रमकपणे खेळणाऱ्या मोहन बागानने आठ सामन्यांत सहा विजय, एक बरोबरी आणि एका पराभवामुळे 19 गुण नोंदवले आहेत. मुंबई सिटीचेही तेवढेच गुण आहेत. त्यामुळेच चुरस वाढली आहे. मोहन बागानने एफसी गोवास हरवल्यास त्यांना पहिल्या स्थानी येणे शक्य होईल.

मार्केझ यांची सावध भूमिका

एफसी गोवाचे प्रशिक्षक मार्केझ यांची भूमिका सावध आहे. त्यांनी सांगितले, की `मोहन बागान संघ वेगवेगळ्या व्यूहरचनेत खेळतो. कधी ते तीन सेंटरबॅक खेळाडू वापरतात, तर कधी बचावफळीत चार खेळाडूंचा पहारा असतो. त्यांच्याकडे खूपच चांगले खेळाडू आहेत, ते एका क्षणात सामन्याचे चित्र बदलून टाकू शकतात. तसे असले, तरी आमच्याकडेही अशाचप्रकारचे खेळाडू आहेत हे दुर्लक्षून चालणार नाही.` एफसी गोवा संघ कोलकात्यात अवे मैदानावर खेळत असला, तरी आम्ही फातोर्ड्यात घरच्या मैदानावर खेळत आहोत या भावनेने खेळू आणि विजयासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास स्पॅनिश मार्गदर्शकाने व्यक्त केला.

एफसी गोवा आतापर्यंतच्या मोहिमेत बचावात भक्कम ठरला आहे. त्यांनी सहा सामन्यांत (त्यापैकी सलग पाच) क्लीन शीट राखताना फक्त तीन गोल स्वीकारले आहेत. एफसी गोवाने सध्या 500 मिनिटांच्या खेळात गोल घेतलेला नाही. आपला संघ बचावात्मक असल्याचे मार्केझ यांनी साफ नाकारले. ते पुढे म्हणाले की, `आमचा संघ बचावा्त्मक नाही. मुंबई सिटीने मागील लढतीत आक्रमणाची धार वाढवल्यानंतर आम्हाला उपाययोजनेसाठी बचावावर लक्ष केंद्रित करावे लागले. आम्हीही गोलच्या संधी निर्माण केल्या. आघाडीफळीत आम्ही अधिक चिकित्सक खेळ केल्यास मोसम खूपच चांगला ठरेल, असे मला वाटते.`

आकडेवारी

- आयएसएल स्पर्धेतील 6 सामन्यांत मोहन बागानचे 4 विजय, एफसी गोवाचा 1 विजय, बरोबरी 1

- यंदा स्पर्धेत एफसी गोवाने 11 गोल नोंदवले, 3 गोल स्वीकारले

- मोहन बागानकडून 8 सामन्यांत 18 गोल, 9 गोल स्वीकारले

- यावेळच्या स्पर्धेत एफसी गोवातर्फे सलग 500 मिनिटे क्लीन शीट

- यापूर्वी 2014 मध्ये मुंबई सिटीने 541 मिनिटे एकही गोल स्वीकारला नव्हता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT