Coach Manolo Marquez
Coach Manolo Marquez Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: एफसी गोवा आक्रमणासाठी सज्ज; मोहन बागानविरुद्ध उद्या करणार दोन हात!

Ganeshprasad Gogate

Indian Super League: मागील सामन्याच्या तुलनेत संघ आक्रमणात आणखी प्रगती साधू शकतो, असे सांगत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी मोहन बागान सुपर जायंट्सविरुद्ध पूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याचे संकेत दिले. या दोन्ही संघांतील महत्त्वपूर्ण सामना बुधवारी (ता. 14) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर खेळला जाईल. एफसी गोवा संघ स्पर्धेत सलग 12 सामने अपराजित आहे.

अगोदरच्या लढतीत त्यांनी एका गोलच्या पिछाडीवरुन जय गुप्ता याच्या लाजबाव गोलच्या बळावर अव्वल स्थानावरील ओडिशा एफसीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. मार्केझ यांनी सांगितले, की `गोल स्वीकारल्यानंतर आम्ही मागील लढतीत खेळ उंचावला. सामन्याचे विश्लेषण करता, संघ आक्रमणात आणखी चांगली कामगिरी बजावू शकतो. त्यादृष्टीने आमचा खेळ केंद्रित असेल.`

बुधवारच्या सामन्याविषयी मार्केझ म्हणाले की, `ते (मोहन बागान) प्रगती साधत आहेत. त्यांनी प्रशिक्षक बदलल्यामुळे शैलीतही बदल झालेला असला, तरी ते निश्चितच तुल्यबळ आहेत. प्रत्येक सामन्यात प्रतिस्पर्ध्यांची सुधारित आवृत्ती अपेक्षित धरुन आम्ही मैदानात उतरतो. सध्या आम्ही अपराजित असलो, तरी एखाद्या दिवशी पराभव होऊ शकतो याची जाणीव आहे.`

दुसरीकडे, मोहन बागानने पहिला टप्पा संपत असताना डिसेंबर अखेरीस सलग पराभवामुळे प्रशिक्षक बदलताना हुआन फेर्रांडो यांच्या जागी अंतोनियो लोपेझ हबास या पूर्वाश्रमीच्या प्रशिक्षकास नियुक्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागानने ईस्ट बंगालला बरोबरीत रोखले, तर हैदराबाद एफसीवर दोन गोलने मात केली. त्यामुळे एफसी गोवास सावध राहावे लागेल.

आकडेवारी

- एफसी गोवाचे 12 सामने, 8 विजय आणि 4 बरोबरी, 28 गुण

- मोहन बागानचे 12 सामन्यांत 7 विजय, 2 बरोबरी आणि 3 पराभवासह 23 गुण

- एफसी गोवाचे 19, तर मोहन बागानचे 23 गोल

- पहिल्या टप्प्यात 23 डिसेंबर 2023 रोजी कोलकाता येथे एफसी गोवाचा 4-1 विजय

- स्पर्धेत एफसी गोवाच्या 7 क्लीन शीट्स, एकमेव अपराजित संघ

- एकमेकांविरुद्ध 7 सामने, मोहन बागानचे 4, एफसी गोवाचे 2 विजय, 1 बरोबरी

`जरी मी बचावपटू असलो, तरी सरावाद्वारे गोल करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. प्रशिक्षकाचा (मार्केझ) माझ्यावर विश्वास आहे. मूलभूत तंत्र न विसरता एकाग्रपणे खेळण्यावर भर देतो. भारताच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे.`

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Assagao case: पूजा शर्माची चौकशीला दांडी, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Sanquelim News: वर्ष वाया जाऊ नये म्हणून दहावी अनुत्तीर्णांनाही समान स्तरावर शिक्षण; मुख्यमंत्री

Rules Change: हे' निर्णय तुमच्या खिशाला भारी पडणार, क्रेडिट कार्डबाबत RBIचा निर्णय; सिमकार्डबाबत बदलले नियम

New Criminal Laws: नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गोव्यात दोन गुन्हे दाखल; पहिली FIR काय?

Colva News: कोलवा पोलिसांचा स्पेशल ड्राइव्ह; ७ व्यक्तींना अटक

SCROLL FOR NEXT