FC Goa
FC Goa  Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: एफसी गोवाचा कस लागणार, अव्वल स्थानी असलेल्या मुंबईसोबत फातोर्ड्यात लढत

किशोर पेटकर

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सलग सतरा लढती अपराजित असलेला मुंबई सिटी संघ अव्वल स्थानी आहे. त्यांच्याविरुद्ध खेळताना एफसी गोवाला खूप मेहनत घ्यावी लागेल, मात्र कर्णधार ब्रँडन फर्नांडिस आपल्या संघाला कमी लेखत नाही. अग्रस्थानावरील संघासाठी सामना सोपा नसेल, असा इशारा त्याने गुरुवारी दिला.

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी (ता.11) मुंबई सिटी व एफसी गोवा यांच्यातील सामना होईल. मुंबईतील संघाने 13 विजय व चार बरोबरीसह सध्या सर्वाधिक 43 गुण प्राप्त केले आहेत. डेस बकिंगहॅम यांच्या मार्गदर्शनाखालील संघ प्ले-ऑफ फेरीत दाखल झाला असून त्यांना लीग विनर्स शिल्ड पटकावण्याची नामी संधी आहे. एफसी गोवा अजूनही प्ले-ऑफ फेरीतील जागेसाठी संघर्ष करत आहे. त्यांचे 17 लढतीनंतर 27 गुण असून ते पाचव्या क्रमांकावर आहेत.

‘‘आमचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे, विशेषतः घरच्या मैदानावर खेळताना कोणालाही हरविण्याची क्षमता असल्याचा आत्मविश्वास आम्हाला वाटतो,’’ असे ब्रँडन म्हणाला. ‘‘फातोर्ड्यात यंदा आमची कामगिरी उत्कृष्ट झालीय. आठपैकी सहा सामने आम्ही जिंकलेत. प्रत्येक प्रतिस्पर्धी संघाचा आम्ही समर्थपणे सामना केला आणि वर्चस्व राखले. मुंबई सिटी संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे हे सत्य असले, तरी त्यांच्यासमोर तुल्यबळ आव्हान उभे करण्याची मला खात्री आहे,’’ असे मध्यफळीत खेळणारा 28 वर्षीय खेळाडू म्हणाला.

प्ले-ऑफसाठी जोरदार चुरस

- तिसऱ्या क्रमांकावरील केरळा ब्लास्टर्सचे 31 गुण

- एटीके मोहन बागानचे जमशेदपूरविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीनंतर 28 गुण व चौथा क्रमांक

- एफसी गोवा 27 गुणांसह पाचव्या, तर बंगळूर एफसी 25 गुणांसह सहाव्या स्थानी

- ओडिशा एफसीही शर्यतीत, 24 गुणांसह सातव्या स्थानी

- हे पाचही संघ प्रत्येकी 17 सामने खेळले असून तीन लढती बाकी

‘‘आकड्यांची मला जाणीव आहे आणि आगामी लढतींचे महत्त्व आम्ही जाणून आहोत. बाकी तिन्ही सामने आम्हाला जिंकायचे आहेत आणि त्याची सुरवात मुंबईविरुद्धच्या लढतीने होईल.’’ असे एफसी गोवाचा कर्णधार ब्रँडन फर्नांडिस म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT