Indian Super League
Indian Super League Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: अपराजित FC गोवाची नॉर्थईस्ट युनायटेडबरोबर लढत; सरत्या वर्षात कोण मारणार बाजी?

किशोर पेटकर

पणजी: सरत्य वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत महत्त्वपूर्ण लढती होत असून एकमेव अपराजित संघ एफसी गोवाला अग्रस्थान बळकट करण्याची संधी असेल. गुवाहाटी येथे शुक्रवारी (ता. 29) त्यांची नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध त्यांची लढत होईल.

दरम्यान, मोहन बागान सुपर जायंट्स आणि केरळा ब्लास्टर्स यांच्यातील सामना बुधवारी (ता. 27) कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर खेळवला जाईल. दोन्ही संघांसाठी या लढतीतील निकाल निर्णायक असेल. केरळा ब्लास्टर्सचे एफसी गोवाइतकेच 23 गुण झाले आहेत. त्यांनी पुन्हा तीन गुण प्राप्त केल्यास एफसी गोवाच्या अग्रस्थानाला आव्हान मिळेल. मुंबई सिटी आणि एफसी गोवाविरुद्ध पराभूत झालेला मोहन बागान संघ सलग तिसरा पराभव टाळण्याच्या प्रयत्नात असेल.

दुसरीकडे, मागील लढतीत केरळा ब्लास्टर्सकडून दोन गोलने पराभूत झालेला मुंबई सिटी संघ घरच्या मैदानावर गुरुवारी (ता. 28) चेन्नईयीन एफसीविरुद्ध खेळेल. मुंबई सिटी आणि मोहन बागानचे सध्या प्रत्येकी 19 गुण असल्यामुळे त्यांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी चुरस आहे. आठवडाभरात ओडिशा एफसी दोन सामने खेळणार आहे, त्यामुळे त्यांना गुणतक्त्यातील स्थान सुधारण्याची संधी राहील. ईस्ट बंगालने गोलशून्य बरोबरी रोखल्यामुळे ओडिशाला दोन गुणांना मुकावे लागले. त्यांचे सध्या 18 गुण आहेत. सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघ मंगळवारी (ता. 26) पंजाब एफसीविरुद्ध खेळेल, तर शुक्रवारी घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीच्या आव्हानास सज्ज होईल.

विक्रमी कामगिरीशी बरोबरी

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाने स्पर्धेत आतापर्यंत नऊ सामन्यांत सात विजय आणि दोन बरोबरी नोंदवत अपराजित मालिका राखली आहे. आयएसएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या नऊ सामन्यांतून 23 गुण प्राप्त करणाऱ्या एफसी गोवाने बंगळूर एफसीने 2018-19 मोसमात बजावलेल्या विक्रमी कामगिरीशी बरोबरी साधली आहे. मागील लढतीत त्यांनी मोहन बागानला 4-1 असे नमविले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED ची गोव्यात मोठी कारवाई! चौगुले उद्योग समूहाच्या सात ठिकाणांवर छापे, कागदपत्रे जप्त

Gallantry Awards: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शूरवीरांना किर्ती अन् शौर्य चक्र प्रदान

Goa: आई स्वयंपाकात व्यस्त असताना चिमुकलीचा वीज तारेशी संपर्क आला, झारखंडच्या मजुर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

Panjim News: अग्निशमनच्या नागपुरातील अधिकाऱ्यांना गोव्यात प्रशिक्षण

Harvalem Caves And Waterfall: इतिहास आणि निसर्गाची आवड आहे? मग हरवळेतील धबधबा आणि पांडवकालीन गुहा नक्की पाहा

SCROLL FOR NEXT