FC Goa Team Dainik Gomantak
क्रीडा

विराट कोहलीने केले FC Goa चे अभिनंदन

FC Goa भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची टिम आहे

दैनिक गोमन्तक

कोलकाता: कोलकाताच्या स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मोहम्मदन स्पोर्टिंगचा 1-0 असा पराभव करून इंडियन सुपर लीग संघ एफसी गोवाने प्रथमच ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धा जिंकला. पणजी: कर्णधार एदू बेदियायाने जादा वेळेतील खेळात थेट फ्रीकिकवर नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवा (FC Goa) संघाने ड्युरँड कप फुटबॉल (Football) स्पर्धेत (Durand Cup Football Tournament) बाजी मारली.

कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर रविवारी झालेल्या अंतिम लढतीत गोव्याच्या संघाने स्थानिक मोहम्मेडन स्पोर्टिंगला 1-0 फरकाने पराभूत केले.कर्णधार एडुआर्डो बेदियाने 105 व्या मिनिटाला गोव्यासाठी विजयी गोल केला. गोव्याचे प्रशिक्षक जुआन फर्नांडो फेनॉल यांचे हे भारतातील पहिले विजेतेपद आहे. गोव्याला विजयासह 40 लाख रुपये मिळाले, तर स्पोर्टिंगला 20 लाख रुपये बक्षीस मिळाले.

म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ड्युरंड चषक जिंकल्याबद्दल एफसी गोवाचे अभिनंदन केले. संघाचा फोटो शेअर करत त्याने सगळ्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. एफसी गोवा विराटची टीम आहे. या टिमने प्रथमच ड्युरंड कप जिंकला त्याबद्दल विराटने त्यांचे कौतूक केले.

सामन्याच्या पूर्वार्धात फारशी कृती दिसली नाही. दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ केला. निर्धारित वेळेत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. सामन्याच्या 105 व्या मिनिटास एफसी गोवातर्फे पाचवा मोसम खेळणाऱ्या स्पॅनिश बेदियाने गुणवत्तेची झलक प्रदर्शित केली. गोलक्षेत्राच्या समोरून त्याने मारलेला फ्रीकिक फटका मोहम्मेडन स्पोर्टिंगच्या गोलरक्षकाला अडविता आला नाही. गोलरक्षक टी. माविया चेंडू अडविण्यासाठी योग्य दिशेने झेपावला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. दोन्ही संघ 90 मिनिटे गोल करू शकले नाहीत,

एफसी गोव्याने दुसऱ्या हाफमध्ये चांगली सुरुवात केली. मिडफिल्डमध्ये चांगल्या खेळामुळे संघाने सामन्यावर आपले नियंत्रण राखले. पण या हाफमध्ये गोव्याला गोल करता आला नाही. अतिरिक्त वेळेत मोहम्मदन स्पोर्टिंगने शानदार सुरुवात केली. वेन वाझला सुरुवातीच्या मिनिटालाच संघाला आघाडी देण्याची संधी होती. पण फुटबॉल गोलरक्षक नवीन कुमारच्या अगदी जवळ पडला आणि त्याने त्याच्या उजवीकडे उडी मारली आणि गोल वाचवला. मात्र 105 व्या मिनिटाला गोव्याचा कर्णधार बेदियाने गोल करून संघाला विजय मिळवून दिला.

एफसी गोवा हा गोव्याचा चौथा संघ आणि ड्यूरंड चषक जिंकणारा आयएसएलचा पहिला संघ आहे. गोव्याचा कर्णधार बेदिया प्लेऑफ ऑफ द टूर्नामेंट ठरला. त्याचवेळी नवीन कुमारला गोल्डन ग्लोव्ह पुरस्कार मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT