Women's Football League: विजेतेपदासाठी एकूण पाच संघांत चुरस

स्पर्धेतील विजेत्या संघाला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) स्पर्धेत खेळण्याची संधी
Women's Football League: जीएफए वेदांता महिला फुटबॉल लीग स्पर्धेसाठी सज्ज झालेला गतविजेता शिरवडे क्लब संघ
Women's Football League: जीएफए वेदांता महिला फुटबॉल लीग स्पर्धेसाठी सज्ज झालेला गतविजेता शिरवडे क्लब संघDainik Gomantak

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (GFA) वेदांता महिला फुटबॉल लीग (Vedanta Women's Football League) स्पर्धेच्या पाचवा मोसम बुधवारपासून सुरू होणार आहे. एकूण पाच संघांत विजेतेपदासाठी चुरस असेल.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सामने होतील. नावेली येथील मैदानावर युनायटेड क्लब तळावली व एफसी गोवा (FC Goa) यांच्यात, तर धर्मापूर मैदानावर गतविजेते शिरवडे स्पोर्टस क्लब व कॉम्पॅशन एफसी यांच्यात लढत होईल. एफसी वायएफए स्पर्धेतील पाचवा संघ आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (AIFF) महिला लीग स्पर्धेत खेळण्याची संधी लाभणार असल्याने सर्व संघासाठी गोवा लीग (Goa Football League) महत्त्वाची आहे. गतमोसमात शिरवडे क्लब व एफसी गोवा यांच्यात विजेतेपदासाठी चुरस होती. एफसी गोवा गतमोसमात उपविजेते होते.

Women's Football League: जीएफए वेदांता महिला फुटबॉल लीग स्पर्धेसाठी सज्ज झालेला गतविजेता शिरवडे क्लब संघ
IPL 2021: मॉर्गन सोबत झालेला वादावर अश्विनचा मोठा खुलासा

FC Goa बलाढ्य संघ

महिला लीग स्पर्धेसाठी एफसी गोवाने भारताच्या सहा आंतरराष्ट्रीय महिला फुटबॉलपटूंचा समावेश असलेला बलाढ्य संघ जाहीर केला आहे. त्यांच्या वीस सदस्यीय संघातील १५ जणांनी गोव्याचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे. संघ सुगितेश मांद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल. ज्योस्लिन डिसोझा, व्हेलानी फर्नांडिस, वालंका डिसोझा या तिघींकडे संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे असतील.

एफसी गोवा संघ: गोलरक्षक – ज्योस्लिन डिसोझा, प्रीती केसरकर, बचावफळी – किंबर्ली फर्नांडिस, कुलसूम शेख, लीना गांवसो, नीफा क्लेमेंत, स्नेहल मोरजकर, खुशबू सौंदत्तीकर, मध्यफळी – अलिशा तावारिस, एन्सिवा वाझ, जॉयव्ही फर्नांडिस, पुष्पा परब, वालंका डिसोझा, अतिरिया आर्डिके, गेल फर्नांडिस, व्हेलानी फर्नांडिस, आघाडीफळी – अर्पिता पेडणेकर, मेलोष्का कार्व्हालो, नमिता गोवेकर, सुश्मिता जाधव.

Women's Football League: जीएफए वेदांता महिला फुटबॉल लीग स्पर्धेसाठी सज्ज झालेला गतविजेता शिरवडे क्लब संघ
हॉकी इंडीयाची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार

गतविजेत्यांना लाभला पुरस्कर्ता

स्पर्धेपूर्वी गतविजेत्या शिरवडे स्पोर्टस क्लबला पुरस्कर्ता लाभल्यामुळे दिलासा मिळाला आहे. या क्लबने दुबईस्थित पायोनियर स्पोर्टस अकादमी (पीएसए) यांच्या करार केला आहे. स्पर्धेत हा संघ शिरवडे पीएसए दुबई स्पोर्टस क्लब या नावाने मैदानात उतरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com