Indian Super League coach Derek Perera Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League : एफसी गोवा गुणतक्त्यातील प्रगतीसाठी प्रयत्नशील

कोविड 19, दुखापतींमुळे मध्यफळीवर परिणाम झाल्याचे प्रशिक्षकाचे प्रतिपादन

Kishor Petkar

पणजी : एफसी गोवा संघाने आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आता युवा खेळाडूंवर विश्वास दाखवत गुणतक्त्यातील स्थान सुधारण्याचे लक्ष्य बाळगल्याचे मुख्य प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी नमूद केले. (Indian Super League News Updates)

एफसी गोवास (FC Goa) मंगळवारी रात्री बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर एटीके मोहन बागानकडून दोन गोलने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर डेरिक बोलत होते. अगोदरच्या लढतीत एफसी गोवाने चेन्नईयीनचा पाच गोलने धुव्वा उडविला होता, पण कोलकात्यातील संघाविरुद्ध त्यांना सूर गवसला नाही. संघातील काही प्रमुख खेळाडू कोविड-19 बाधित आहेत, तसेच काहींना दुखापतींचाही फटका बसला. त्यामुळे मध्यफळी कमजोर झाली आणि पराभवाचे हे एक कारण असल्याचे डेरिक यांनी स्पष्ट केले. एफसी गोवाचे सध्या 17 लढतीतून 18 गुण असून ते नवव्या क्रमांकावर आहेत. साखळी फेरीतील आणखी तीन सामने बाकी आहेत. एफसी गोवाचा पुढील सामना 19 रोजी हैदराबाद एफसीविरुद्ध होईल.

‘‘प्रक्रिया अजूनही कायम आहे. प्ले ऑफच्या अजूनही आशा वाटत असून गुणतक्त्यातील आमचे स्थान सुधारण्यासाठी मेहनत घेत राहू. त्याचवेळी आम्ही संघाच्या भविष्यावरही काम करत आहोत,’’ असे डेरिक यांनी सांगितले. ‘‘आवश्यकतेनुसार नवोदितांना अधिक संधी देऊ, पण विनाकारण त्यांना मुख्य प्रवाहात खोलवर सोडण्याचे टाळू. आमच्यापाशी काही खूप गुणवान खेळाडू आहेत आणि त्यांना टप्प्याटप्प्याने मुख्य संघात सामावून घेतले जाईल. त्यांना पुरेसा वेळ देणे महत्त्वाचे आहे,’’ असे डेरिक यांनी स्पष्ट केले.

मध्यफळीकडून निराशा

‘‘मी कारण देणार नाही, पण गेल्या काही दिवसांत आमच्या संघात काही कोविड-19 प्रकरणे आहेत हे सत्य आहे. काही कारणास्तव आम्ही सराव करू शकलो नाही. मध्यफळीत आम्ही काही प्रमुख खेळाडूंच्या सेवेस मुकलो,’’ असे पराभवानंतर संघाच्या कामगिरीचे विश्लेषण करताना डेरिक म्हणाले. ‘‘अपेक्षेनुसार आम्ही मध्यफळीत खेळू शकलो नाही. बहुतेक वेळा आम्ही चेंडूवरील नियंत्रण गमावले आणि मला वाटतं, त्याचा प्रतिकुल परिणाम कामगिरीवर झाला. पूर्वार्धाच्या सुरवातीचा गोल आणि उत्तरार्धातील चुकीचा पास यामुळे झालेला दुसरा गोल यामुळे आमच्यावरील दबाव वाढला,’’ असे मत डेरिक यांनी व्यक्त केले.

पूर्वाश्रमीच्या खेळाडूंचा दणका

एटीके मोहन बागानसाठी (ATK Mohan Bagan) दोन गोल केलेला मनवीर सिंग आणि लिस्टन कुलासो हे एफसी गोवाचे माजी खेळाडू. या दोघांनीही मंगळवारी रात्री आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाला चांगलेच सतावले. एटीके मोहन बागानचे मार्गदर्शक हुआन फेरांडोही एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक. यंदा सहा सामन्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. एटीके मोहन बागान आता दोन मोसम एफसी गोवाविरुद्ध अपराजित आहे. गोव्याच्या संघाविरुद्ध चार लढतीत त्यांनी तीन विजय व एक बरोबरी अशी कामगिरी केली आहे. मनवीर व लिस्टन यांचे कौतुक करताना ते क्लब आणि राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करत असल्याबद्दल डेरिक यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या विकासाबद्दल एफसी गोवास अभिमान वाटत असून त्यांच्याप्रकारे खेळाडू तयार करण्यावर भर राहील, अशी टिप्पणीही 59 वर्षीय प्रशिक्षकाने केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Earthquake in BAN vs IRE 2nd Test: बॉलिंग-बॅटिंग सोडून 'पळापळ'! भूकंपानं मैदान हादरलं, खेळाडूंंमध्ये भीतीचं वातावरण

Pakistan Factory Blast: पाकिस्तानात फॅक्टरीत भीषण स्फोट, 15 ठार, 7 जखमी; फॅक्टरीचा मालक फरार, मॅनेजरला अटक

VIDEO: ना भरजरी साडी ना मेकअप! साऊथची 'ब्युटी क्वीन' साई पल्लवीचा 'IFFI' मध्येही पारंपरिक लूक, अभिनेत्रीच्या सौंदर्याची होतेय चर्चा

Goa Cable Issue: ..अखेर मार्ग मोकळा! वीज खांबांवरील केबल्स कापल्या जाणार; गोवा खंडपीठाचा स्थगितीस नकार

Bicholim Water Crisis: गोव्यातील 'या' भागावर घोंघावतेय पाणीसंकट! जलवाहिनी गळतीमुळे वाढला धोका; हजारो लिटर पाणी वाया

SCROLL FOR NEXT