RFD League Latest Updates | FC Goa defeats Mumbai in RFD League Dainik Gomantak
क्रीडा

RFD League : एफसी गोवाची मुंबईवर निसटती मात

RFD League Latest News : यंग चँप्सला नमवून केरळा ब्लास्टर्स दुसऱ्या स्थानी

किशोर पेटकर

RFD League : सामन्याच्या उत्तरार्धात ब्रायसन फर्नांडिस याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवा संघाने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटीवर 1-0 अशी निसटती मात केली. आणखी एका लढतीत केरळा ब्लास्टर्सने आरएफ यंग चँप्सवर 4-0 फरकाने सफाईदार विजय नोंदवून गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले. (FC Goa defeats Mumbai in RFD League)

नागोवा येथील मैदानावर ब्रायसनने 64व्या मिनिटास नोंदविलेल्या गोलमुळे एफसी गोवाने स्पर्धेतील तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता सहा लढतीतून 10 गुण झाले आहेत. हैदराबाद एफसीचेही तेवढेच गुण आहेत. गोलसरासरीत कमी असल्याने गोव्यातील संघ चौथ्या स्थानी राहिला. मुंबई सिटीला सलग सहावा पराभव पत्करावा लागला. त्यांना स्पर्धेत एकही गोल नोंदविता आलेला नाही.

बाणावली येथे केरळा ब्लास्टर्सने आरएफ यंग चँप्सला सहजपणे हरविले. मुहंमद बासिथ (42वे मिनिट), महंमद अझहर (47वे मिनिट), व्हिन्सी बार्रेटो (76वे मिनिट), एम. एस. श्रीकुट्टन (90+5वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. केरळा ब्लास्टर्सचा हा सहा सामन्यांतील पाचवा विजय ठरला. त्यांचे 15 गुण झाले असून अव्वल स्थानावरील बंगळूर एफसीपेक्षा त्यांचे तीन गुण कमी आहेत. तीन सामने अपराजित राहिलेल्या यंग चँप्सला तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहा लढतीनंतर त्यांचे सात गुण कायम राहिले.

बंगळूर, केरळा ब्लास्टर्स ‘नेक्स्ट जन कप’साठी पात्र

इंग्लंडमध्ये होणाऱ्या ‘नेक्स्ट जन कप’ या युवा फुटबॉल स्पर्धेसाठी बंगळूर एफसी व केरळा ब्लास्टर्स पात्र ठरले आहेत. डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेची एक फेरी बाकी असताना बंगळूर (18 गुण) व केरळा ब्लास्टर्स (15 गुण) या संघाचे पहिले दोन क्रमांक निश्चित झाले व त्यात बदल होणार नाही. या स्पर्धेतील अनुक्रमे पहिला व दुसरा संघ इंग्लंडमध्ये खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT