Velsao club And FC Goa  Dainik Gomantak
क्रीडा

Development League Football : एफसी गोवा, वेळसाव मुख्य फेरीसाठी पात्र

अखेरच्या साखळी लढतीत गोलशून्य बरोबरी

किशोर पेटकर

एफसी गोवा आणि वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लबने रिलायन्स फाऊंडेशन डेव्हलपमेंट लीग फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्रता मिळविली आहे. स्पर्धेच्या गोवा विभागीय फेरीत त्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळविला.

शिरसई येथील सेझा अकादमी मैदानावर रविवारी झालेल्या गोवा विभागातील शेवटच्या साखळी लढतीत एफसी गोवा व वेळसाव यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरी राहिल्यामुळे त्यांना प्रत्येकी एक गुण मिळाला. दोन्ही संघ स्पर्धेत अपराजित राहिले.

दोन्ही संघांनी रविवारच्या सामन्यात गोलसाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश लाभले नाही. सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना एफसी गोवासाठी गोल करण्याची चांगली संधी होती.

मात्र साईश गावकरचा फटका वेळसाव संघाच्या बचावपटूने ऐनवेळी रोखून गोलशून्य बरोबरीची कोंडी कायम राखली. त्यानंतर वसीम इनामदार याला संधीला लाभ घेता आली नाही, त्यामुळे एफसी गोवाचे आक्रमक पुन्हा एकदा विफल ठरले.

गोवा विभागीय फेरीत एफसी गोवा आणि वेळसाव क्लबने प्रत्येकी पाच विजय व दोन बरोबरी या कामगिरीसह समान 17 गुण झाले. सरस गोलसरासरीत एफसी गोवा संघाने पहिला क्रमांक मिळविला, तर वेळसाव संघ दुसऱ्या स्थानी राहिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT