Studium Dainik Gomantak
क्रीडा

भारतीय वंशाच्या खेळाडूचा धमाका, जबरदस्त षटकारांनी जागतिक क्रिकेटमध्ये आणला भूकंप!

Indian Player Record, Taranjeet Singh: क्रिकेटमध्ये अनेकदा विक्रम एकामागून एक बनतात आणि मोडले जातात.

Manish Jadhav

Indian Player Record, Taranjeet Singh: क्रिकेटमध्ये अनेकदा विक्रम एकामागून एक बनतात आणि मोडले जातात. जागतिक क्रिकेटमध्ये शतके, हॅटट्रिक, झेल आणि फलंदाजीशी संबंधित अनेक विक्रम बनले आणि मोडले गेले. आता एक खेळाडू T10 लीगमध्ये आपल्या अप्रतिम फलंदाजीने चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, तो खेळाडू भारतीय वंशाचा आहे.

33 चेंडूत शतक

तरनजीत सिंग नावाच्या खेळाडूने आपल्या फलंदाजीने धूमाकूळ घातला. त्याने भरपूर चौकार आणि षटकार मारले. त्याने अवघ्या 33 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. 322 च्या स्ट्राईक रेटने धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. युरोपियन क्रिकेट मालिकेत (ECS) त्याने हा पराक्रम केला.

भारतीय वंशाचा खेळाडू

रोमानियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या तरनजीत सिंगने मैदानावर खळबळ उडवून दिली. त्याने शानदार षटकार ठोकले. युरोपियन क्रिकेट सीरिज (ECS) T10 लीगमध्ये 33 चेंडूत शतक झळकावणारा तरनजीत मूळचा भारतीय आहे. त्याने 40 चेंडूत 129 धावा केल्या. ज्यामध्ये 14 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. एवढेच नाही तर डावाच्या 9 व्या षटकात अल अमीनच्या चेंडूवर सलग 5 षटकार ठोकले.

संघ 96 धावांनी जिंकला

सलामीवीर म्हणून उतरलेल्या तरनजीत सिंगने शानदार फलंदाजी केली. त्याच्या खेळीमुळे टीम क्लुजने अवघ्या 10 षटकांत 3 गडी गमावून 186 धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना बुखारेस्ट सुपर किंग्ज संघाने 90 धावांत 8 विकेट गमावल्या आणि सामना 96 धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. संघाच्या सलामीवीरांनाच दुहेरी आकडा गाठता आला. क्लुजकडून रजित परेराने 2 षटकांत 5 धावा देत 3 बळी घेतले.

अशी आंतरराष्ट्रीय कारकीर्द आहे

दरम्यान, 37 वर्षीय तरनजीत सिंगने आतापर्यंत 19 टी-20 सामन्यांमध्ये एक शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 704 धावा केल्या आहेत. एवढेच नाही तर तो ऑफस्पिनरही आहे. तरनजीतने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 26 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पंचाची भूमिकाही पार पाडली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: राज्यात पावसानं पुन्हा उडवली दाणादाण, पर्वरीत वाहनधारकांची त्रेधातिरपिट; चिखलामुळे वाहतूक कोंडी!

Goa Live Updates: वाळपईत पावसाचं धूमशान

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'सोमवारपर्यंत चौकशी आयोग नेमा अन्यथा...'; कॅश फॉर जॉब प्रकरणी पाटकरांचा सावंत सरकारला अल्टिमेटम

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT