chanakyas image looks like ms dhoni Dainik Gomantak
क्रीडा

चाणक्य अन् कॅप्टन कूल 'सेम टू सेम'; सोशल मीडियावर फोटो होतोय तूफान व्हायरल

शास्त्रज्ञांच्या एका समूहाने भारतीय तत्वज्ञ 'चाणक्य' यांची प्रतिमा तयार केली आहे.

Manish Jadhav

Philosopher Chanakyas Image Looks Like MS Dhoni: सोशल मीडियावर एक फोटो तूफान व्हायरल होत आहे. शास्त्रज्ञांच्या एका समूहाने भारतीय तत्वज्ञ 'चाणक्य' यांची प्रतिमा साकारली आहे. विशेष म्हणजे, ही प्रतिमा भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा CSK चा कर्णधार एमएस धोनीसारखी दिसत आहे. होय, सेम टू सेम अशी दिसणारी प्रतिमा (फोटो) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स हा फोटो पाहून आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

दरम्यान, चाणक्य हे एक प्राचीन भारतीय तत्वज्ञ आहेत. शिक्षक, लेखक, रणनीतिकार, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. चतुर रणनीतिकार म्हणून त्यांची ख्याती होती. चाणाक्य यांनी चंद्रगुप्त मौर्याच्या राजदरबारात सल्लागार म्हणून काम केले. त्यांचे सर्वात प्रसिद्ध कार्य म्हणजे 'अर्थशास्त्र' हे राजकारणावरील लोकप्रिय पुस्तक आहे, जे ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकादरम्यान लिहिले गेले.

दुसरीकडे, चाहते एमएस धोनीला क्रिकेटचा 'चाणक्य' म्हणून संबोधतात. आयपीएलमध्ये CSK साठी कर्णधार म्हणून भूमिका बजावताना तो आपल्या चतुराईने सामन्याची रंगत बदलतो. क्रिकेट फॅन धोनीवर खूप प्रेम करतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक ट्विट व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये वापरकर्त्याने दावा केला आहे की, बिहारमधील मगध डीएस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी चाणक्यचे फोटो काढले आणि ते हुबेहुब एमएस धोनीसारखे दिसत आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “मगध डीएस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी चाणक्य कसे दिसत असतील याचे हे 3D मॉडेल तयार केले आहे.”

दुसरीकडे, CSK फ्रँचायझीने चेपॉक मैदानावर एमएस धोनीच्या पहिल्या नेट सत्राचा व्हिडिओ अपलोड केला, ज्यामध्ये तो नेहमीप्रमाणे मस्त आणि तंदुरुस्त दिसत आहे. आयपीएलचा हा हंगाम 42 वर्षीय धोनीचा शेवटचा असू शकतो अशी शक्यता आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने गेल्या वर्षी त्यांच्या पाचव्या आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली होती. या विजेतेपदकाने त्याच्या संघाने मुंबई इंडियन्सच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. त्यानंतर कॅप्टन कूलच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिला सामना CSK विरुद्ध RCB असा घरच्या मैदानावर (चेपॉक) रंगणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Serendipity Arts Festival: बहुविध कलांचा मोठा महोत्सव! 'सेरेन्डिपिटी'साठी सजतेय पणजी; जगभरातील कलाकार-प्रेक्षक येणार एकत्र

Konkani Film Festival: काणकोण येथे रंगणार 'कोकणी चित्रपट महोत्सव'! कुठे कराल बुकिंग, काय आहेत तारखा; जाणून घ्या..

Illegal Cattle Transport: बेतोडा येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या गुरांची वाहतूक रोखली; तीन गुरांची सुटका

Omkar Elephant: 'आता गोवाच मदत करू शकतो', ओंकारची महाराष्ट्रात फरपट; सिंधुदुर्गातील नागरिकांचे मंत्री राणेंना आवाहन

IFFI Goa 2025: गोमंतकीय कलाकार, सिनेकर्मींचे इफ्फीत स्थान काय? आणखी एक ‘फ्लॉप’ आवृत्ती..

SCROLL FOR NEXT