Fans and Players of Manchester City Club celebration Dainik Gomantak
क्रीडा

Manchester City चे चॅम्पियन्स लीग विजयानंतर घरी जोरदार स्वागत, हजारो चाहते उतरले रस्त्यावर, पाहा Video

मँचेस्टर सिटीने UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवल्यानंतर त्यांचे घरच्या चाहत्यांकडून जोरदार स्वागत झाले.

Pranali Kodre

Fans and Players of Manchester City Club celebration: इंग्लिंश फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीने नुकतेच UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले. यानंतर मँचेस्टर सिटीचा संघ त्यांच्या घरी म्हणजेच मँचेस्टरला पोहचला. यावेळी चाहत्यांकडून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले.

मँचेस्टर सिटीने पहिल्यांदाच UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच यंदाच्या हंगामात या संघाने एफए कप आणि इंग्लिश प्रीमियर लीगचेही विजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे एकाच हंगामात या तीन ट्रॉफी जिंकणारा मँचेस्टर सिटी मँचेस्टर युनायटेड नंतरचा पहिलाच संघ ठरला आहे.

या तिन्ही ट्रॉफी मँचेस्टर सिटीच्या खेळाडूंनी रस्त्यावर उतरलेल्या हजारो चाहत्यांसमोर उंचावल्या. तसेच खेळाडूंच्या स्वागत संमारंभात दरम्यान बस परेडचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी मँटेस्टर सिटी संघातील अर्लिंग हालांद, केविन ब्रुयने असे अनेक खेळाडू खूप खुश दिसत आहेत.

या स्वागत सोहळ्यावेळी खास रॉक शो देखील आयोजित करण्यात आलेला. विशेष म्हणजे यावेळी पाऊस आल्यानंतरही चाहते आनंद साजरे करताना मागे हटले नाहीत. चाहत्यांचे हे सेलिब्रेशन अगदी मँचेस्टर सिटी संघ इस्तांबुलमधून मँचेस्टरच्या विमानतळावर उतरल्यापासून पाहायला मिळाला होता.

इंटर मिलानला दिली मात

शनिवारी (10 जून) 68 व्या UEFA चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीने इंटर मिलनविरुद्ध 1-0 अशा गोलफरकाने विजय मिळवत चॅम्पियन्स लीग ट्रॉफीवर नाव कोरले आहे.

इस्तांबुलमधील अतातुर्क ऑलिम्पिक स्टेडियममध्ये झालेल्या या अंतिम सामन्यात इंटर मिलानने कडवी लढत दिल्यानंतरही 68 मिनिटाला रोड्रिगोने इंटर मिलानचा बचाव भेदला आणि पहिला गोल नोंदवला. हा एकमेव गोल या सामन्यात झाला. या गोलमुळे मँचेस्टर सिटीने विजेतेपदावर नाव कोरले.

मँचेस्टर सिटीने प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक पाँइंट्स मिळवले, तसेच काही दिवसांपूर्वीच झालेल्या एफए कपमध्ये अंतिम सामन्यात मँचेस्टर सिटीने मँचेस्टर युनायटेडला पराभूत करत विजेतेपद आपल्या नावावर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT