Fan breaches security to Meet Rohit Sharma PTI and AFP
क्रीडा

IND vs ENG: विराटची जर्सी घातलेल्या प्रेक्षकाने रोहितला भेटण्यासाठी तोडली मैदानाची सुरक्षा, फोटो व्हायरल

Cricket Fan breaches security: हैदराबाद कसोटीदरम्यान एका प्रेक्षकाने मैदानाची सुरक्षा भेदत रोहित शर्माची भेट घेतली होती.

Pranali Kodre

Fan breaches security to enter stadium and meet Rohit Sharma during India vs England Hyderabad Test:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याला गुरुवारी (25 जानेवारीपासून) सुरुवात झाली.

दरम्यान हैदराबादला खेळल्या जाणाऱ्या पहिल्याच सामन्याच्या पहिल्याच दिवशी एका प्रेक्षकाने मैदानाची सुरक्षा तोडल्याची घटना पाहायला मिळाली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.

झाले असे की राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा डाव 64.3 षटकात 246 धावांवर संपल्यानंतर भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला.

यावेळी सलामीला रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल फलंदाजी करत होते. त्याचवेळी एक प्रेक्षक मैदानातील सुरक्षा रक्षकांना हुलकावणी देत मैदानात घुसला आणि त्याने खेळपट्टीवर असेलेल्या रोहित शर्माची भेट घेतली.

तो प्रेक्षक रोहितचे पाय धरतानाही दिसला. त्यानंतर लगेचच मैदानातील कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर नेले. या प्रेक्षकाने विराट कोहलीचे नाव आणि जर्सी क्रमांक असेलली जर्सी घातली होती. या घटनेचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मैदानात सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनी मैदानाची सुरक्षा तोडत खेळाडूंना भेटण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा घटना अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तसेच जॉनी बेअरस्टोने 37 धावा आणि बेन डकेटने 35 धावांची खेळी केली.

भारताकडून गोलंदाजी करताना रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

त्यानंतर पहिल्या दिवसाखेरपर्यंत भारताने 23 षटकात 1 बाद 119 धावा केल्या. पहिल्या दिवसाखेर यशस्वी जसस्वाल 70 चेंडूत 76 धावांवर नाबाद होता, तर शुभमन गिल 14 धावांवर नाबाद होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: वडखळ नाक्याच्या दुरावस्थेविरोधात शेकापचं आंदोलन, मुंबई - गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

हाडं, अंडी, मेणबत्ती लावून शाळेच्या मैदानात ब्लॅक मॅजिक? हळदोणात रात्री बारा वाजता तरुणीला घेतलं ताब्यात

Verca Fire News: '..पतीनेच पेटवली दुचाकी'! वार्कातील आग प्रकरणावरून पत्नीची तक्रार; कौटुंबिक वादातून घटना घडल्याची माहिती

Buimpal: भरवस्तीत चिमुकल्याच्या अपहरणाचा प्रयत्न, हाताचा चावा घेऊन 12 वर्षीय मुलाची सुटका; पोलिसांचा तपास सुरु

Goa Agriculture Ambassador: स्वयंपूर्णतेचा संदेश देणारा वरद ‘कृषिदूत’! गोवा सरकारकडून ॲम्बेसिडर म्हणून निवड; भाजी उत्पादनात प्रगतीचा ध्यास

SCROLL FOR NEXT