MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

'I Love You माही भाई...', धोनीला पाहताच चाहत्यानं ठोकली आरोळी; व्हिडिओ व्हायरल!

Fans shouted after seeing Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' या नावाने प्रसिद्ध आहे.

Manish Jadhav

Fans shouted after seeing Dhoni: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 'कॅप्टन कूल' या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला कॅप्टन कूल का म्हणतात हे प्रत्यक्षात पाहायला मिळाले. क्रिकेटचे मैदान असो की जीवन, माहीचा चेहरा नेहमीच प्रफुल्लित दिसतो.

धोनीने पुन्हा एकदा फक्त एका स्मितहास्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. धोनीचा विमानतळावरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये धोनीने चाहत्यांची मनं कशी जिंकली हे पाहायला मिळत आहे.

I Love You माही भाई

दरम्यान, धोनी विमानतळावर पोहोचला होता. यावेळी सुरक्षा तपासणीदरम्यान धोनीच्या एका चाहत्याने 'माही भाई आय लव्ह यू' अशी आरोळी ठोकली, यावर धोनीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, कदाचित त्याने ते ऐकले नसेल.

यानंतर चाहत्याने पुन्हा हाक मारली आणि 'माही भाई आय लव्ह यू' असे म्हटले. यावेळी मात्र, धोनीने चाहत्याचा आवाज ऐकला आणि हसायला लागला. चाहत्याने पुढे म्हटले की, 'माझे हात थरथरत आहेत.' आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तूफान व्हायरल होत आहे. धोनीच्या साधेपणाचे कौतुक करताना चाहते थकत नाहीत.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 15 सेकंदांचा आहे. ज्यामध्ये धोनीने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. त्याने काळा चष्मा आणि गडद निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. कॅप्टन कूलचा हा लूक खूपच किलर दिसत आहे.

चाहत्यांनाही त्याचा हा लूक खूप आवडला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. माहीचे कौतुक करताना एका चाहत्याने 'एमएसडी'ची बीसीसीआयने टीम इंडियासाठी (Team India) मेंटर म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT