MS Dhoni: यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत अल्काराझची धडक, कॅप्टन कूलने लुटला मॅचचा आनंद; Vedio

MS Dhoni Watching US Open 2023: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करत आहे.
MS Dhoni Watching US Open 2023
MS Dhoni Watching US Open 2023Dainik Gomantak

MS Dhoni Watching US Open 2023: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करत आहे. दरम्यान, यूएस ओपन मॅचचा आनंद लुटतानाचा धोनीचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्पर्धेच्या अधिकृत ब्रॉडकास्टरने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यूएस ओपनमध्ये गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि अजेक्जेंडर ज्वेरेव यांच्यात खेळलेला उपांत्यपूर्व सामना पाहण्यासाठी धोनी आला होता.

दरम्यान, या सामन्यात कार्लोस अल्काराझने ज्वेरेवचा 6-3, 6-2 आणि 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले.

आता उपांत्य फेरीत कार्लोस अल्काराझचा सामना 3 ऱ्या क्रमांकावर असलेला आणि 2021 च्या यूएस ओपनचा विजेता डॅनिल मेदवेदेवशी होईल. 2018 नंतर प्रथमच यूएस ओपनच्या 3 माजी विजेत्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

MS Dhoni Watching US Open 2023
US Open 2023: रोहन बोपण्णा-मॅथ्यू एब्डेन जोडीचा जलवा, सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक!

धोनीबद्दल सांगायचे झाल्यास, आयपीएल 2023 चा हंगाम संपल्यानंतर त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले. यानंतर धोनीने पुढचे काही महिने रिहॅबमध्ये घालवले आणि आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचे विजेतेपद पटकावले आहे. सध्या सर्वाधिक आयपीएल विजेतेपदांच्या बाबतीत चेन्नई मुंबई इंडियन्ससह (Mumbai Indians) पहिल्या स्थानावर आहे.

MS Dhoni Watching US Open 2023
US Open 2023: यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत जोकोविचची धडक! आता 'या' खेळाडूशी होणार मुकाबला

आयपीएलच्या पुढील हंगामात धोनी खेळेल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी अनेक फ्रँचायझींनी आधीच तयारी केली आहे. त्याचवेळी, चाहत्यांना आशा आहे की, धोनी 2024 च्या आयपीएल (IPL) हंगामात खेळताना दिसेल.

16 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर धोनीने आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, पुढील हंगामात खेळायचे की नाही हे ठरवण्यासाठी त्याच्याकडे अजून बराच वेळ आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com