Ethan Vaz  Dainik Gomantak
क्रीडा

Ethan Vaz : आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या एथनची 'सुवर्ण' कामगिरी

आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा इंडोनेशियातील बाली येथे झाली.

किशोर पेटकर

Ethan Vaz : गोव्याचा युवा प्रतिभाशाली बुद्धिबळपटू एथन वाझ याने आशियाई 12 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली. क्लासिकल खुल्या गटात त्याला वैयक्तिक विजेतेपद मिळाले, तर सांघिक गटात सुवर्णपदक जिंकलेल्या भारतीय संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले.

आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा इंडोनेशियातील बाली येथे झाली. या स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळे एथनला फिडेकडून प्रतिष्ठेचा फिडे मास्टर किताबही प्राप्त झाला. त्यासाठी आवश्यक 2100 एलो मानांकन गुणांचा टप्पा त्याने ओलांडला.

एथन 11 वर्षांचा आहे. गतमहिन्यात त्याने अकरावा वाढदिवस साजरा केला. आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला गोमंतकीय बुद्धिबळपटू ठरला आहे. हल्लीच जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याला बुद्धिबळ डाव सोडविण्याच्या स्पर्धेत रौप्यपदक मिळाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT