Eoin Morgan Dainik Gomantak
क्रीडा

इंग्लंडला विश्वविजेता बनवणाऱ्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा

35 वर्षीय मॉर्गन हा इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.

दैनिक गोमन्तक

इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इऑन मॉर्गनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 35 वर्षीय मॉर्गन हा इंग्लंडचा सर्वाधिक धावा करणारा तसेच एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मॉर्गनने इंग्लंडकडून 225 एकदिवसीय सामन्यांमध्ये 13 शतकांसह 6957 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मॉर्गनच्या एकूण 14 शतकांसह 7701 धावा आहेत. (Eoin Morgan Announces Retirement From International Cricket)

दरम्यान, इऑन मॉर्गनने (Eoin Morgan) 126 सामन्यांमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले, ज्यात त्याने 76 जिंकले. या कालावधीत त्याची विजयाची टक्केवारी 65.25 होती. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक म्हणजे इंग्लंडला घरच्या भूमीवर 2019 मध्ये ICC पुरुष क्रिकेटमधील विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले.

तसेच, मॉर्गन हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देखील होता. त्याने 115 सामन्यात 14 अर्धशतके आणि 136.18 च्या सरासरीने 2458 धावा केल्या. मॉर्गन गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झुंज देत होता. मॉर्गनने गेल्या 28 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केवळ दोन अर्धशतके झळकावली होती. मॉर्गनच्या जागी जोस बटलरकडे इंग्लंडच्या (England) वनडे आणि टी-20 संघाची कमान सोपवली जाऊ शकते, असे मानले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT