Phil Salt - Harry Brook ICC
क्रीडा

WI vs ENG, T20I: 4,6,6,2,6...ब्रुकचा आक्रमक अंदाज, तर सॉल्टचही शतक! 222 धावांनंतरही विंडीज पराभूत

West Indies vs England: इंग्लंडने तब्बल 223 धावांचा यशस्वी पाठलाग करत वेस्ट इंडिजला तिसऱ्या टी20 सामन्यात पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

West Indies vs England, 3rd T20I at Grenada, Result:

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघात 5 सामन्यांची टी20 मालिका सुरू असून तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने 7 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेतील त्यांनी पहिला विजय नोंदवला.

ग्रेनेडामध्ये झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर २२३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग इंग्लंडने 19.5 षटकात 3 बाद 226 धावा करत पूर्ण केला. इंग्लंडकडून शतक करणारा फिल सॉल्ट आणि अखेरच्या षटकात फटकेबाजी करणारा हॅरी ब्रुक इंग्लंडच्या विजयाचे नायक ठरले.

या सामन्यात अखेरच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 21 धावांची गरज होती. यावेळी फलंदाजी ब्रुक करत होता, तर सॉल्ट नॉन-स्ट्रायकरला होता. या षटकात आंद्रे रसेलने गोलंदाजी केली. दरम्यान, त्याच्या गोलंदाजीवर ब्रुकने हल्लाबोल केला.

त्याने पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला, त्यानंतर सलग दोन षटकार ठोकत इंग्लंडचा विजय सोपा केला. यानंतर ब्रुक आणि सॉल्ट यांनी दुहेरी धावा घेतल्या, तर पाचव्या चेंडूवर ब्रुकने पुन्हा षटकार ठोकला आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या सामन्यात इंग्लंडकडून कर्णधार जॉस बटलर आणि फिलिप सॉल्ट यांनी सलामीला दमदार खेळ केला होता. त्यांनी 10 षटकांमध्येच संघाला 100 धावांच्या जवळ पोहोचवले. त्यांच्यात 115 धावांची सलामी भागीदारी झाली. पण ही भागीराही आंद्र रसेलने तोडली. त्याने बटलरला 51 धावांवर माघारी पाठवले.

त्यानंतर लगेचच विल जॅक्सला गुडाकेश मोतीने 1 धावेवरच बाद केले. पण त्यानंतर लियाम लिव्हिंग स्टोनने सॉल्टला चांगली साथ दिली होती. त्यांच्या अर्धशतकी भागीदारीही झाली. मात्र, 18 व्या षटकात लिव्हिंगस्टोन 18 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. त्यानंतर ब्रुक सॉल्टला साथ देण्यासाठी आला. दरम्यान, सॉल्टने त्याचे आक्रमक शतकही पूर्ण केले.

नंतर शेवटच्या दोन षटकात ब्रुक आणि सॉल्टने मिळून 31 धावा पूर्ण करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. ब्रुक 7 चेंडूत 31 धावांवर नाबाद राहिला, तर सॉल्टने 4 चौकार आणि 9 षटकारांसह 56 चेंडूत 109 धावांची नाबाद खेळी केली.

वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत जेसन होल्डर, आंद्रे रसेल आणि गुडाकेश मोतीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. त्यांनी 8 धावेवरच दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. तसेच शाय होपही 26 धावा करून बाद झाला.

पण निकोलस पुरनने वेस्ट इंडिजचा डाव सांभाळला. त्याला कर्णधार रोवमन पॉवेल आणि शेर्फाने रुदरफोर्डने चांगली साथ दिली होती. त्यांच्यात अर्धशतकी भागीदारीही झाल्या. पण पॉवेलला 39 धावांवर सॅम करनने बद केले. त्यानंतर पुरनही 45 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकार मारून आदील राशिदच्या गोलंदाजीवर बाद झाला.

रुदरफोर्डने 17 चेंडूत 29 धावा केल्या. अखेरीस जेसन होल्डरने केलेल्या आक्रमणामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 बाद 222 धावा केल्या. होल्डर 5 चेंडूत 18 धावांवर नाबाद राहिला, तर रसेलने 5 चेंडूत नाबाद 8 धावा केल्या.

इंग्लंडकडून गोलंदाजीत सॅम करन आणि आदील राशिद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तसेच मोईन अली आणि रिस टोप्ली यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: कोकणी, मराठी समजल्याशिवाय ग्राहकाला काय हवे हे बँकेतील कर्मचाऱ्याला कसे कळणार?

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Horoscope: गेलेले पैसे परत मिळणार, आर्थिक गणिते सुटणार; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

SCROLL FOR NEXT