England Cricket Team PTI
क्रीडा

IND vs ENG: आम्ही ठरलोय सक्सेसफुल! 190 धावांच्या पिछाडीनंतरही इंग्लंडने केला कोणालाच न जमलेला पराक्रम

Pranali Kodre

India vs England, 1st Test at Hyderabad:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील पहिला सामना हैदराबादला पार पडला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात इंग्लंडने 28 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा हा विजय ऐतिहासिक ठरला. त्यांनी या सामन्यात कोही मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

या सामन्यात भारताने पहिल्या डावात 190 आघाडी घेतली होती. पण असे असतानाही इंग्लंडने दुसऱ्या डावात ऑली पोपने केलेल्या 196 धावांच्या खेळीच्या मदतीने 102.1 षटकात 420 धावा केल्या आणि भारतासमोर 231 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संघ 202 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे इंग्लंडने विजयावर शिक्कामोर्तब केले.

तसेच इंग्लंड हा पहिला संघ ठरला, ज्यांनी भारतात भारताविरुद्ध कसोटी सामन्यात 100 हुन अधिक धावांची पिछाडी स्विकारल्यानंतरही विजयाची नोंद केली. यापूर्वी 1964 साली चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाने 65 धावांची पिछाडी स्विकारल्यानंतर भारताविरुद्ध विजय मिळवला होता.

इंग्लंडने भारताविरुद्ध सर्वात जास्त धावांची पिछाडी स्विकारल्यानंतरही विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर श्रीलंका आहे. श्रीलंकने 2015 साली गॉलमध्ये 192 धावांची पिछाडी स्विकारली होती. पण असे असतानाही श्रीलंकेने 63 धावांनी विजय मिळवला होता.

भारताविरुद्ध पहिल्या डावात सर्वात जास्त धावांची पिछाडी स्विकारल्यानंतरही विजय मिळवणारे संघ -

  • 192 धावांची पिछाडी - श्रीलंका (गॉल, 2015)

  • 190 धावांची पिछाडी - भारत (हैदराबाद, 2024)

  • 132 धावांची पिछाडी - इंग्लंड (बर्मिंगहॅम, 2022)

  • 80 धावांची पिछाडी - ऑस्ट्रेलिया (ऍडलेड, 1992)

  • 69 धावांची पिछाडी - ऑस्ट्रेलिया (सिडनी, 2008)

भारताला मिळालेली आघाडी...

हैदराबाद कसोटीत पहिल्या डावात इंग्लंडने 64.3 षटकात सर्वबाद 246 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने 121 षटकात सर्वबाद 436 धावा करत 190 धावांची आघाडी घेतली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT