Sarah Taylor Partner Pregnant Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup दरम्यान 'या' महिला क्रिकेटपटूच्या फोटोची चर्चा, कोहलीची फॅन...

Sarah Taylor Partner Pregnant: इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू सारा टेलरच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे.

Manish Jadhav

Sarah Taylor Partner Pregnant: इंग्लंड महिला क्रिकेट संघाची माजी खेळाडू सारा टेलरच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. साराने सोशल मीडियावर याची घोषणा केली आहे. तिने तिची जोडीदार डायना गरोदर असल्याची माहिती दिली. साराने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

दरम्यान, सारा टेलरने डायनासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि सांगितले की, हा प्रवास सोपा नव्हता, पण त्याचा एक भाग झाल्याचा आनंद आहे. साराने लिहिले, आई बनणे हे माझ्या जोडीदाराचे नेहमीच स्वप्न राहिले आहे. हा प्रवास सोपा नव्हता, पण डायनाने हार मानली नाही. मला माहित आहे की, 19 आठवड्यांनंतर आयुष्य खूप वेगळे असेल.'

दुसरीकडे, सारा टेलरच्या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक अॅडम गिलख्रिस्टने प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, 'अभिनंदन लीजेंड, एक अद्भुत प्रवास तुमची वाट पाहत आहे.' सारा सर्वाधिक प्रवास करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंमध्ये गणली जाते. मानसिक तणावामुळे तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

तसेच, मानसिक आरोग्यामुळे 2016 मध्ये सारानेही ब्रेक घेतला होता. तिने इंग्लंडला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनवले. साराने 2006 मध्ये पदार्पण केले. तिने एकूण 226 सामने खेळले, ज्यात 10 कसोटी, 126 एकदिवसीय आणि 90 टी-20 सामने आहेत.

त्याचबरोबर, साराने तीन वेळा आयसीसी (ICC) महिला क्रिकेटर ऑफ द इयरचा किताब पटकावला आहे. 2014 मध्ये तिला महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. 2009 आणि 2017 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा ती भाग होती.

शिवाय, 2009 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचाही ती एक भाग होती. सारा टेलर आणि टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहलीचा किस्सा खूप चर्चेत होता. 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना विराट कोहली एकदा तिला भेटण्यासाठी पहाटे पाच वाजता साराच्या खोलीत पोहोचला होता. त्याचबरोबर, साराने कोहली हा सर्वात आवडता क्रिकेटर असल्याचे सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT