England Cricket Team 
क्रीडा

England Cricket: इंग्लंडचे मोठे पाऊल! पहिल्यांदाच मल्टी-ईयर कॉन्ट्रॅक्ट केलं जाहीर, स्टोक्सला मात्र...

England Cricket Central Contract: इंग्लंड क्रिकेटने पहिल्यांदाच खेळाडूंचा बहुवार्षिक करार जाहीर केला आहे.

Pranali Kodre

England Cricket Board announced Multi-year contracts for Men's international cricketers:

भारतात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. याचदरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने पुरुष खेळाडूंचा केंद्रीय करार जाहीर केला आहे.

दरम्यान, इंग्लंड क्रिकेटने यंदा पहिल्यांदाच बहुवार्षिक केंद्रीय करार जाहीर केला आहे. हा करार 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाला आहे. या करारात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांचा विचार करण्यात आला आहे.

विस्ताराने सांगायचे झाल्यास, इंग्लंडने भविष्याच्या दृष्टीने मागील कामगिरी लक्षात घेऊन आगामी काळात कोणते खेळाडू इंग्लंड संघासाठी सर्व प्रकारात सहभागी होऊ शकतात, याचा विचार करून हा करार जाहीर केला आहे.

साल 2000 पासून खेळाडूंना केंद्रीय करार देण्यात येतो. तेव्हा 23 वर्षांनंतर पहिल्यांदाच खेळाडूंना बहूवार्षिक करार देण्यात आला आहे.

इंग्लंड क्रिकेटने एकूण 29 खेळाडूंना यंदा केंद्रीय करार दिला आहे. यामध्ये १८ खेळाडूंना बहुवार्षिक करार मिळाला आहेत. तसेच 8 खेळाडूंना वार्षिक करार मिळाला आहे. त्याचबरोबर 3 खेळाडूंना विकास करार मिळाला आहे.

दरम्यान, वार्षिक करार मिळालेल्या 8 खेळाडूंमध्ये बेन स्टोक्स हे मोठे नाव आहे. तर बहुवार्षिक करारातील तीन वर्षांसाठी करार मिळालेल्या चार खेळाडूंमध्ये जो रुट, मार्क वूड आणि हॅरी ब्रुक यांचा समावेश आहे.

तथापि, रेहमान अहमन, गस ऍटकिन्सन, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, मॅथ्यू पॉट्स, जोश टंग या 7 खेळाडूंना पहिल्यांदाच इंग्लंड क्रिकेटचा करार मिळाला आहे. त्याचबरोबर डेव्हिड मलानचे करारात पुनरागमन झाले आहे, त्याला गेल्यावर्षी करार मिळाला नव्हता.

इंग्लंडचे केंद्रीय करार

  • तीन वर्षांचा करार -

    • जो रुट, हॅरी ब्रुक, मार्क वूड

  • दोन वर्षांचा करार -

    • रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जोनी बेअरस्टो, जॉस बटलर, ब्रायडन कार्स, झॅक क्रावली, सॅम करन, बेन डकेट, लियाम लिव्हिंगस्टोन, ऑली पोप, मॅथ्यु पॉट्स, आदिल राशिद, जोश टंग, ख्रिस वोक्स.

  • एका वर्षाचा करार -

    • मोईन अली, जेम्स अँडरसन, बेन फोक्स, जॅक लीच, डेविड मलान, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, रिस टोप्ली.

  • विकास करार

    • मॅथ्यु फिशर, साकिब मेहमूद, जॉन टर्नर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rakhi 2025 Lucky Colors: रक्षाबंधन विशेष, राशीनुसार कपड्यांचे आणि राखीचे कोणते रंग शुभ आहेत? जाणून घ्या

Nagpanchami 2025: संपूर्ण गोव्यात नागपंचमी उत्साहात साजरी

Free Train To Konkan: चाकरमान्यांका बाप्पा पावलो! गणेशोत्सवात दादर ते कुडाळ करता येणार 'मोफत प्रवास', एका कॉलवर करा बुकिंग

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

IND vs ENG: फक्त 'इतकं' करा आणि 2 विक्रम मोडा! ओव्हलमध्ये घडणार मोठा करिष्मा; भारत-इंग्लंड मिळून मोडणार 70 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT