Joe Root - Jos Buttler Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वनडे इतिहासात 4658 सामने झाले, पण हा पराक्रम करणारा इंग्लंड बनला पहिलाच संघ

England vs New Zealand: इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकप 2023 मधील पहिलाच सामना खेळताना मोठा विश्वविक्रम रचला आहे.

Pranali Kodre

England create World Record during Cricket World Cup 2023 match against New Zealand:

वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात गुरुवारी खेळला गेला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने एक विश्वविक्रम केला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे इंग्लंड संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. इंग्लंडला या सामन्यात 300 धावांचा पल्ला गाठण्यात अपयश आले मात्र, त्यांच्याकडून फलंदाजीसाठी उतरलेल्या सर्व 11 खेळाडूंनी मिळून विश्वविक्रमाला गवसणी घातली.

इंग्लंडचा विश्वविक्रम

इंग्लंडकडून या सामन्यात सर्व 11 फलंदाजांनी फलंदाजी केली. विशेष म्हणजे फलंदाजीला उतरलेल्या सर्व 11 खेळाडूंनी 10 धावांचा आकडा म्हणजे दोन आकडी धावसंख्या पार केली. त्यामुळे वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले की एका डावात एखाद्या संघाच्या सर्व 11 खेळाडूंनी दोन आकडी धावा केल्या.

इंग्लंड आणि न्यूझीलंड संघातील हा वनडे इतिहासातील 4658 वा सामना होता. पण यापूर्वी खेळवण्यात आलेल्या 4657 सामन्यात एकदाही असा पराक्रम कोणत्याही संघाला करता आला नव्हता.

इंग्लंडच्या फलंदाजांची सांघिक कामगिरी

इंग्लंडकडून जो रुटने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार जॉस बटलरने 43 धावा केल्या. याशिवाय इंग्लंडच्या खालच्या फळीनेही महत्त्वाचे योगदान दिले. इंग्लंडकडून सलामीला फलंदाजीला आलेल्या जॉनी बेअरस्टोने 33 धावांची खेळी केली, तर डेव्हिड मलानने 14 धावा केल्या.

तसेच हॅरी ब्रुक 25 धावावंर बाद झाला, तर मोईन अलीने 11 धावा केल्या. तसेच लियाम लिव्हिंगस्टोनने 20 धावा केल्या, तर सॅम करन 14 धावांवर बाद झाा. तसेच ख्रिस वोक्सने 11 धावा केल्या. याबरोबर आदिल राशिद 15 धावांवर आणि मार्क वूड 13 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे इंग्लंडने 50 षटकात 9 बाद 282 धावा केल्या.

न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल सँटेनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच रचिन रविंद्र आणि ट्रेंट बोल्ट यांनी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT