England Team  Dainik Gomantak
क्रीडा

Ashes Series 2023: शेवट गोड करण्यासाठी इंग्लंड तयार! पाचव्या कसोटीसाठी प्लेइंग 11 जाहीर

Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून (27 जुलै) लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर पाचवी आणि शेवटची ऍशेस कसोटी खेळली जाणार आहे.

Manish Jadhav

Ashes Series 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून (27 जुलै) लंडनमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर पाचवी आणि शेवटची ऍशेस कसोटी खेळली जाणार आहे. इंग्लंडने बुधवारी ओव्हल कसोटीसाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली.

दरम्यान, 41 वर्षीय वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) संघात कायम ठेवण्यात आले आहे. इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

ऍशेस मालिकेत ऑस्ट्रेलिया सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. मँचेस्टर येथे झालेला चौथा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.

दरम्यान, सध्याच्या मालिकेत अँडरसनला आतापर्यंत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने तीन सामन्यांत केवळ 4 विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत ऍशेसनंतर अँडरसनच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची चर्चा होती.

मात्र, पाचव्या सामन्यापूर्वी अँडरसनने याप्रकरणी मौन सोडत मोठे वक्तव्य केले आहे. निवृत्तीचा विचार करत नसल्याचे तो म्हणाला. अँडरसनने 182 कसोटीत 689 विकेट घेतल्या आहेत.

तो जगातील सर्वाधिक कसोटी बळी घेणारा वेगवान गोलंदाज आहे. एकूण यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पाचव्या कसोटीसाठी इंग्लडची प्लेइंग 11

बेन डकेट, जॅक क्रॉली, मोईन अली, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

ऍशेस मालिकेबद्दल...

ऍशेस मालिकेबद्दल बोलायचे झाल्यास, सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने (Australia) जिंकले आहेत. तर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने शानदार पुनरागमन करत विजय मिळवला. मात्र चौथा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.

आता 27 जुलैपासून पाचवी कसोटी सुरु होणार आहे, ज्यावर तमाम क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. सध्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया पुढे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT