Team India X/BCCI
क्रीडा

IND vs ENG: जडेजाच्या फिरकीने संपवला इंग्लंडचा डाव, जो रुट-रॉबिन्सनची झुंजार खेळीने पाहुण्यांच्या 353 धावा

India vs England, 4th Test: भारताविरुद्ध रांचीत सुरू असलेल्या कसोटीत इंग्लंडचा संघ 353 धावांवर पहिल्या डावात सर्वबाद झाला.

Pranali Kodre

India vs England, 4th Test:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना रांचीमध्ये शुक्रवारपासून सुरू झाला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात इंग्लंडचा पहिला डाव 104.5 षटकात 353 धावांवर संपुष्टात आला.

इंग्लंडकडून जो रुट शतकी खळी करून नाबाद राहिला, तसेच ऑली रॉबिन्सननेही शानदार अर्धशतक केले. भारताकडून या डावात रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

या सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 91 षटकापासून आणि 7 बाद 302 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी शतक करणारा जो रुटने 106 धावांपासून आणि रॉबिन्सनने 31 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली.

दरम्यान, सुरुवातीला रुटने एक बाजू सांभाळली असताना रॉबिन्सनने काही आक्रमक फटकेही खेळले. त्याचबरोबर त्याने अर्धशतकही पूर्ण करताना रुटबरोबर 8 व्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली.

मात्र अर्धशतकानंतर 103 व्या षटकात रॉबिन्सन रविंद्र जडेजाविरुद्ध खेळताना यष्टीरक्षक ध्रुव जुरेलकडे झेल देत बाद झाला. यानंतर याच षटकात जडेजाने शोएब बशीरलाही माघारी धाडले. तर जेम्स अँडरसनलाही शुन्यावर बाद करत जडेजाने इंग्लंडचा डाव संपवला. अखेरीस जो रुट 274 चेंडूत 10 चौकारांसह 122 धावांवर नाबाद राहिला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या या डावात पहिल्या दिवशीच जो रुटने शतक पूर्ण केले होते. इंग्लंडने पहिल्या तीन विकेट्स 57 धावांवरच गमावल्या होत्या. भारताच्या पदार्पणवीर आकाश दीपने इंग्लंडला पहिले तीन धक्के दिले होते.

परंतु, त्यानंतर रुटने एक बाजू शेवटपर्यंत भक्कम सांभाळली. त्याने आधी जॉनी बेअरस्टोबरोबर (38) 52 धावांची भागीदारी केली. तसेच बेन फोक्सबरोबर सहाव्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी केली.

दरम्यान, फोक्सचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले. तो 47 धावांवर बाद झाला. तत्पुर्वी सलामीवीर झॅक क्रावलीने 42 धावा केल्या होत्या.

दरम्यान, पहिल्या डावात भारताकडून जडेजाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच आकाश दीपने 3 विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराजने 2 विकेट्स घेतल्या. आर अश्विनने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT