England Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs NED: इंग्लंडने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, हॅरी ब्रूकला मिळाली संधी; नेदरलँड्सच्या प्लेइंग-11मध्येही बदल

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 40 वा सामना इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात खेळवला जात आहे. उभय संघांमधील हा सामना 8 नोव्हेंबर (आज) रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळवला जात आहे.

या सामन्यात इंग्लिश कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड (England) संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मार्क वुड आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या जागी हॅरी ब्रूक आणि गस ऍटकिन्सन यांना संधी मिळाली आहे.

नेदरलँड्सच्या (Netherlands) प्लेइंग-11 मध्येही बदल करण्यात आला आहे. साकिब झुल्फिकारच्या जागी तेजा निदामनुरुचे पुनरागमन झाले आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर जोस बटलर म्हणाला, ''आम्ही प्रथम फलंदाजी करु. विकेट चांगली दिसत आहे. आम्हाला चांगली धावसंख्या उभारायची आहे. हे सामने आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.

आम्हाला हा सामना जिंकायचा आहे. सुधारणेला भरपूर वाव आहे. स्वतःवर विश्वास ठेवायलाही शिकले पाहिजे. गोष्टी योग्य दिशेने नेण्यास आम्ही उत्सुक आहोत.''

तर, डच कर्णधार स्कॉट एडवर्ड्स म्हणाला, ''आम्ही आतापर्यंत जे क्रिकेट खेळलो त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही संघात बदल केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. झुल्फिकारच्या जागी तेजा निदामनुरुचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला आहे.''

दोन्ही संघांची प्लेइंग-11

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रुट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार, यष्टिरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद.

नेदरलँड्स: मॅक्स ओ'डॉड, वेस्ली बरेसी, कॉलिन अकरमन, सिब्रांड एंजेलब्रेक्ट, स्कॉट एडवर्ड्स (सी, डब्ल्युके), बास डी लीडे, तेजा नदामानुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.

दरम्यान, आजचा सामना काळ्या मातीने बनवलेल्या खेळपट्टीवर होत आहे. सहसा काळ्या मातीची खेळपट्टी थोडी संथ असते आणि फिरकीला मदत करते पण आजची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल दिसतेय. येथे चांगल्या धावा करता येतात.

गेल्या 6 सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांनी येथे 77% विकेट्स मिळवल्या आहेत. अशा परिस्थितीत आजही वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते. खेळपट्टीवर चांगली उसळी आहे आणि वेगही आहे. तसेच, खेळपट्टीवर फिरकीपटूंनाही काही संधी असतील. एकूणच ही खेळपट्टी खेळाच्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी योग्य असणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT