Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

विराट कोहलीने Oval Test मध्ये विक्रम करत, मास्टर ब्लास्टरला टाकले मागे!

कोहलीने (Virat Kohli) हे स्थान फक्त 490 डावांमध्ये मिळवले आणि सर्वात जलद 23000 धावा करणारा फलंदाज बनला.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्या बॅटमधून बाहेर पडणाऱ्या धावा त्याच्या खात्यात काही विक्रम नोंदवत आहेत. असाच एक विक्रम कोहलीने ओव्हल कसोटीच्या (Oval Test) पहिल्या दिवशी केला आहे. विराटने या डावात चौकार ठोकून आपले खाते उघडले आणि यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले 23000 धावा पूर्ण केले. कोहलीने हे स्थान फक्त 490 डावांमध्ये मिळवले आणि सर्वात जलद 23000 धावा करणारा फलंदाज बनला.

विराटने या प्रकारात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करणाऱ्या सचिनने 522 डावांमध्ये 23000 धावा पूर्ण केल्या. सचिनकडे एकूण 34 हजारांहून अधिक धावा आहेत. सचिन व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंगचेही (Ricky Ponting) नाव या ओळीत आहे. पाँटिंगने 544 डावांमध्ये 23000 धावांचा टप्पा गाठला.

पाँटिंगकडे 27 हजारांहून अधिक धावा आहेत. गेल्या दशकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसचाही (Jacques Kallis) पहिल्या 5 फलंदाजांमध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने 551 डावांमध्ये हे स्थान मिळवले होते. त्याने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत 25 हजारांहून अधिक धावा केल्या. या यादीत श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) हा डावखुरा फलंदाज आहे. श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने 568 डाव घेत 23000 धावांचा पल्ला गाठला असून नंतर कारकिर्दीच्या शेवटपर्यंत 28 हजारांहून अधिक धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT