टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Wicketkeeper-batsman Rishabh Pant) या सामन्यात एक विक्रम करण्याची संधी आहे. dainik gomantak
क्रीडा

ENG vs IND: तिसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतला त्याचाच विक्रमाची मोडण्याची संधी

आतापर्यंत खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पंतची बॅट काही विशेष दाखवू शकलेली नाही. इंग्लंड दौऱ्यात त्याने आतापर्यंत अर्धशतकही केले नाही. मात्र, यष्टीमागे त्याने चमकदार कामगिरी केली आहे.

दैनिक गोमन्तक

टीम इंडिया (Team India) सध्या इंग्लंड (England) दौऱ्यावर आहे. येथे भारतीय संघाला पाच कसोटींची मालिका खेळायची आहे. आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले गेले आहेत. पहिल्या कसोटीत शेवटच्या दिवशी पावसाने पाणी फिरविले. पण लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत विराटच्या सैन्याने दमदार कामगिरी करत सामना 151 धावांनी जिंकला. आता 25 ऑगस्टपासून दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Wicketkeeper-batsman Rishabh Pant) या सामन्यात एक विक्रम करण्याची संधी आहे.

पंत इतिहास घडवेल?

टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रिषभ पंतच्या नावावर आहे. त्याने 2018 मध्ये 16 षटकार मारले होते. पंतने माजी अनुभवी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला होता. धोनीने 2006 मध्ये 12 षटकार ठोकले होते. पंतने यावर्षी इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत 15 षटकार ठोकले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत त्याने आणखी दोन षटकार ठोकले तर एका वर्षात 17 षटकार ठोकणारा तो भारताचा पहिला यष्टीरक्षक फलंदाज बनू शकतो. याबरोबरच पंत त्याचाच 2018 मध्ये 16 षटकार खेचण्याचा विक्रमही मोडेल.

आतापर्यंत खेळलेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये पंतची बॅट काही विशेष दाखवू शकलेली नाही. इंग्लंड दौऱ्यात त्याने आतापर्यंत अर्धशतकही केले नाही. मात्र, यष्टीमागे त्याने चमकदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या कसोटीत पंतला पुन्हा फॉर्ममध्ये येण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती. तो इंग्लंडमधील त्याच्या नातेवाईकांच्या घरी विलगिकरणात होता. क्वारंटाईन संपल्यानंतर तो टीम इंडियामध्ये पुन्हा सामील झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

Navpancham Yog 2026: सप्टेंबर महिन्याची सुरुवातच ठरणार जॅकपॉट! गुरु-शनिच्या 'नवपंचम योगा'ने चमकणार 4 राशींचे नशीब; घरात नांदणार सुख-समृद्धी

Morjim Drugs Bust: मोरजीतील गेस्ट हाऊसवर पोलिसांचा छापा; 'ड्रग्स' रॅकेटचा पर्दाफाश, तीन सेनेगाली नागरिक अटकेत, 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT