Indian Batsman C. Pujara (Headingley in Eng Vs Ind Test) Tweeter/ @ICC
क्रीडा

Eng Vs Ind: भारतीय फलंदाजांनी लढवली खिंड

पराभवाचे ढग अजूनही कायम (Eng Vs Ind)

Dainik Gomantak

Eng Vs Ind: भारतीय संघासाठी सामन्याचा तिसरा दिवस थोडासा दिलासादायक ठरला. आज खेळाच्या सुरवातीलाच भारतीय संघाने इंग्लंड चे शिल्लक 2 फलंदाजांना केवळ 9 धावांत तंबूत धाडले. व इंग्लंडचा संघ 432 धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 गडी बाद केले (M Shami took 4 Wkt). त्याचप्रमाणे बुमराह, सिराज व जडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

त्यानंतर दुसऱ्या डावाची फलंदाजी करायला उतरलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात केलेल्या चुकीतून शिकवण घेत अतिशय सावध पवित्रा स्विकारला. भारतीय सलामी जोडी स्थिर होतेय असे वाटत असताना के एल राहुल 54 चेंडूत 8 धावा बनवून बाद झाला. त्यानंतर आलेल्या पुजाराने आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी केली, रोहित शर्मा (Rohit Sharma) व पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांची जोडी बऱ्यापैकी जमली. रोहित - पुजारा या जोडीने इंग्लंड संघाला विकेटसाठी बराच वेळ तडफवले. अखेरीस रॉबिनसनच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा 59 धावांवर पायचीत झाला. (Rohit 59 Runs)

त्यानंतर आलेला फलंदाज व भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Captain Virat Kohli) स्थिरावलेल्या पुजाराला अनुकूल साथ दिली, व धावफलक हलता ठेवला. पुजाराने आज 50 धावांच्या सरासरीने व 15 चौकारांच्या सहाय्याने नाबाद 91 धावा बनवल्या. कर्णधार विराट कोहली 94 चेंडूत 45 धावांवर खेळात आहे. (Pujara & Kohli Not Out) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताने 80 षटकांमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 215 धावा जमवल्या. इंग्लंडतर्फे ओली रॉबिन्सन व क्रेग ओव्हरटन यांनी प्रत्येकी 1 गाडी प्राप्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT