जडेजाने दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने 44 षटके टाकली, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघ तिसऱ्या कसोटीत अश्विनला संधी देऊ शकतो. Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: तिसऱ्या कसोटीत जडेजाच्या जागी अश्विनला संधी मिळण्याची शक्यता

जर सामन्याच्या आधी पावसाने व्यत्यय आणला तर जडेजाच्या जागी अश्विनचा समावेश होऊ शकतो, पण जर हवामान कोरडे राहिले तर जडेजा आणि अश्विन दोघांनाही संघात स्थान दिले जाऊ शकते.

दैनिक गोमन्तक

इंग्लंडविरुद्ध (England) लॉर्ड्स कसोटीसाठी रविचंद्रन अश्विनचा (Ravichandran Ashwin) भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (India's playing XI) समावेश न केल्याने सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जेव्हा रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) प्राधान्य देण्यात आले, तेव्हा कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. जडेजाने दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने 44 षटके टाकली, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे रवींद्र जडेजाच्या जागी संघ तिसऱ्या कसोटीत अश्विनला संधी देऊ शकतो.

जडेजा हा पहिल्या पसंतीचा फिरकी गोलंदाज होता मुख्यतः त्याने फलंदाजीतही योगदान दिले आहे. नॉटिंगहॅम आणि लंडनमधील हवामान हे त्याला खेळविण्यात महत्त्वाचे होते. ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स या दोन्ही ठिकाणी अधूनमधून पाऊस आणि ढगाळ आकाश, भारतीय वेगवान गोलंदाजांना अनुकूल होते. त्यामुळे फलंदाजीचा क्रम मजबूत करण्यासाठी जडेजाची संघात निवड केली गेली.

पहिल्या कसोटीत रवींद्र जडेजाने 16 षटके टाकली त्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. यादरम्यान इंग्लंडचे फलंदाज त्याची गोलंदाजी सहज खेळताना दिसले नाहीत. दुसऱ्या कसोटीतही जडेजा फारसा प्रभाव सोडू शकला नाही. जडेजाने 28 षटके टाकली आणि 48 धावा दिल्या. इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याला सहज खेळवले. दुसरीकडे, इंग्लंडचा एकमेव फिरकीपटू मोईन अलीने दुसऱ्या कसोटीत तीन विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्यात जडेजाला आत्तापर्यंत फक्त दोन विकेट मिळाल्या आहेत. त्याने WTC फाइनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याला एक विकेट घेता आली. दुसरीकडे अश्विनने चांगली कामगिरी केली आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चार विकेट्स घेतल्या, तर सराव सामन्यात त्याने 7 विकेट घेतल्या.

मुश्ताक मोहम्मदने द टेलीग्राफ इंडियाला सांगितले, “अश्विन भारताच्या गेम प्लॅनचा महत्त्वाचा भाग असू शकतो. तो इशांतपेक्षाही चांगली फलंदाजी करू शकतो. तिसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टीही अश्विनच्या बाजूने असेल. कारण लीड्समधील तिसऱ्या कसोटी दरम्यान कोरड्या परिस्थितीचा अंदाज आहे. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता कमी आहे आणि सूर्यप्रकाशाची शक्यता देखील आहे. याचा अर्थ परिस्थिती कोरडी असेल तर विराट गोलंदाजीमध्ये बदल करु शकतो. चार वेगवान गोलंदाज आणि एका फिरकीपटूऐवजी तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह भारत तिसऱ्या कसोटीत उतरु शकतो.

जर सामन्याच्या आधी पावसाने व्यत्यय आणला तर जडेजाच्या जागी अश्विनचा समावेश होऊ शकतो, पण जर हवामान कोरडे राहिले तर जडेजा आणि अश्विन दोघांनाही संघात स्थान दिले जाऊ शकते. अशावेळी इशांतला बाहेर बसावे लागू शकते. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वी परिस्थिती लक्षात घेऊन प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Goa Assembly Session: समुद्रकिनाऱ्यांवरून बेकायदेशीर दलाल आणि मार्गदर्शकांना हटवा

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

धारगळच्या कमांड एरियातील जमीन केवळ कॅसिनोसाठी डेल्टा कंपनीला दिली; आलेमाव यांचा आरोप

Goa University: प्रेयसीसाठी प्राध्यापकाने प्रश्नपत्रिका चोरी केल्याचे प्रकरण विधानसभेत गाजले; कायद्यात दुरुस्ती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT