Ellyse Perry Breaks Car Window X
क्रीडा

Ellyse Perry: पेरीची तोडफोड बॅटिंग, मैदानाबाहेरच्या कारची काचच फोडली, Video तुफान व्हायरल

Ellyse Perry Breaks Car Window: WPL 2024 मध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या एलिस पेरीने सोमवारी झालेल्या सामन्यात एक असा शॉट मारला की ज्यामुळे मैदानाबाहेर असलेल्या कारची काचच फुटली.

Pranali Kodre

Ellyse Perry Breaks Car Window

वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत सोमवारी (4 मार्च) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध युपी वॉरियर्स यांच्यात बंगळुरूला सामना झाला. या सामन्यात बेंगलोरची कर्णधार स्मृती मानधाना आणि अष्टपैलू एलिस पेरीने आक्रमक फलंदाजी केली. याचदरम्यान, पेरीच्या एका शॉटने तर कारची काचही फुटली.

झाले असे की बेंगलोर संघ प्रखम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. यावेळी शभ्भीनेनी मेघना मानधनाबरोबर अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर 28 धावांवर बाद झाली. त्यानंतर मात्र मानधना आणि पेरीची जोडी जमली.

एकबाजू पेरीने सांभाळलेली असताना मानधनाने आक्रमण केले. पण त्यांची जोडीही 95 धावांच्या भागीदारीनंतर तुटली. मानधना 50 चेंडूत 80 धावा करून बाद झाली. यानंतर पेरीने ऋचा घोषला साथीला घेतले. तिने आक्रमक खेळताना अर्धशतकही पूर्ण केले.

पेरीच्या शॉटने तुटली कारची काच

त्यानंतर 19 व्या षटकात तिने दिप्ती शर्माच्या गोलंदाजीवर डीप मीड-विकेटवरून योग्य टायमिंग साधत शॉट खेळला. हा शॉट मैदानाबाहेर उभ्या केलेल्या स्पॉन्सर कारला लागला. चेंडू फक्त कारला लागलाच नाही, तर कारच्या खिडकीची काचही चेंडू जोरात आदळल्याने फुटली.

जेव्हा कारची काच फुटलेल्याचे सर्वांच्या लक्षात आले, तेव्हा बेंगलोर संघातील सर्वच चकीत होते. पेरीनेही नंतर आश्चर्याने डोक्याला हात लावला होता. तिची ही रिऍक्शनही सध्या व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्यानंतर याबद्दल बोलताना मजेने पेरी म्हणाली, 'मला थोडी काळजी वाटली. मला माहित नाही की नुकसान कव्हर करायला माझ्याकडे इथे इंन्सुरन्स आहे की नाही.'

दरम्यान, पेरी या सामन्यात अखेरच्या षटकात बाद झाली. तिने 37 चेंडूत 58 धावांची खेळी केली. तसेच ऋचा घोषने नाबाद 21 धावा केल्या. त्यामुळे बेंगलोरला 20 षटकात 3 बाद 198 धावा करता आल्या. युपीकडून अंजली सारवानी, चामरी अटापट्टू आणि सोफी इक्लेस्टोन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 199 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना युपी वॉरियर्सला 20 षटकात 8 बाद 175 धावाच करता आल्या. युपीकडून कर्णधार एलिसा हेलीने आक्रमक 55 धावांची खेळी केली होती.

तसेच दिप्ती शर्माने 33 आणि पुनम खेमणारने 31 धावा केल्या. परंतु, अन्य कोणाला खास काही करता आले नाही. बेंगलोरकडून सोफी डिवाईन, सोफी मोलिनेक्स जॉर्जिया वेरहॅम आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maje Driver App: खासगी दुचाकींवर भाडे वाहतूक केल्यास थेट जप्ती! 50 वर्षांवरील मोटारसायकल पायलटांना 'DSSY'चा लाभ; CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

PM मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान; राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांच्याकडून गौरव

Kannada Medium Schools: कानडी शाळांचा प्रश्न कर्नाटक दरबारी; मंत्री जारकीहोळी करणार मुख्यमंत्री शिवकुमार यांच्यासोबत चर्चा

Pedne Toll Booth Case: टोल बूथ तोडफोड प्रकरण! नितेश राणे अखेर म्हापसा न्यायालयात हजर

Viral Video: अचानक कोसळलं सुपरमार्केटचं छत! क्षणात उडाला गोंधळ, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT