Elena Rybakina Dainik Gomantak
क्रीडा

US Open Final 2026: एलेना रिबाकिना बनली नवी 'चॅम्पियन'! जागतिक नंबर 1 सबालेंकाचा पराभव करत जिंकला पहिला यूएस ओपन ताज; स्टेफी ग्राफचा मोडला रेकॉर्ड

Elena Rybakina US Open 2026 Winner: टेनिस जगतात एका नव्या युगाची सुरुवात करत कझाकस्तानच्या अव्वल टेनिसपटू एलेना रिबाकिनाने यूएस ओपन 2026च्या महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले.

Manish Jadhav

Elena Rybakina US Open 2026 Winner: टेनिस जगतात एका नव्या युगाची सुरुवात करत कझाकस्तानच्या अव्वल टेनिसपटू एलेना रिबाकिनाने यूएस ओपन 2026च्या महिला एकेरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध आर्थर ॲश स्टेडियमवर पार पडलेल्या अत्यंत थरारक आणि संघर्षाने भरलेल्या फायनल सामन्यात रिबाकिनाने जगातील अव्वल क्रमांकाच्या खेळाडू आर्यना सबालेंकाचा पराभव करत हे ऐतिहासिक विजेतेपद पटकावले.

आर्यना सबालेंका सलग तिसऱ्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, मात्र दुर्दैवाने तिला पुन्हा एकदा उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. या विजयामुळे रिबाकिना टेनिस जगतातील नवीन डब्ल्यूटीए वर्ल्ड नंबर 1 खेळाडू बनली.

फायनल सामन्याच्या पहिल्या सेटपासूनच एलेना रिबाकिनाने सामन्यावर आपले पूर्ण वर्चस्व निर्माण केले होते. तिने आक्रमक सर्व्हिस आणि अचूक शॉट्सच्या जोरावर पहिला सेट 6-4 असा सहज खिशात घातला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये जागतिक नंबर 1 सबालेंकाने कडवी झुंज देत जोरदार पुनरागमन केले आणि हा सेट 7-5 असा जिंकून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये पोहोचला. तिसऱ्या आणि अंतिम सेटमध्ये रिबाकिनाने पुन्हा एकदा उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सबालेंकाला कोणतीही संधी दिली नाही.

तिने 5-2 अशा फरकाने तिसरा सेट जिंकत कारकिर्दीतील दुसऱ्या यूएस ओपन आणि एकूण तिसऱ्या ग्रँड स्लॅम ट्रॉफीवर कब्जा केला. या ऐतिहासिक विजयासह रिबाकिनाने 31 वर्षांपूर्वीचा महान टेनिसपटू स्टेफी ग्राफचा विक्रम मोडीत काढला. एकाच वर्षात दोन ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यांमध्ये (ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन) जगातील नंबर 1 खेळाडूला पराभूत करणारी ती स्टेफी ग्राफ (1995) नंतरची टेनिस इतिहासातील दुसरीच महिला (Women) खेळाडू ठरली. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्येही रिबाकिनाने सबालेंकाचा पराभव केला होता.

महिला एकेरीच्या ऐतिहासिक फायनलचा थरार संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष पुरुषांच्या एकेरीच्या फायनल सामन्याकडे लागले आहे. पुरुष एकेरीचा फायनल सामना जगातील नंबर 1 खेळाडू ॲलेक्झांडर ज्वेरेव्ह आणि अमेरिकेचा अव्वल खेळाडू बेन शेल्टन यांच्यात रंगणार आहे. ज्वेरेव्ह आपल्या कारकिर्दीतील दुसऱ्या मोठ्या विजेतेपदासाठी मैदानात उतरेल, तर बेन शेल्टन 2003 नंतर ग्रँड स्लॅम सिंगल्स जिंकणारा पहिला अमेरिकन पुरुष खेळाडू बनण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळीचा तडाखा! सत्तरीत घरावर झाड कोसळले; 40 सुपारी आणि 60 केळीची झाडे मोडली

SCROLL FOR NEXT