Durand Cup : FC Goa coach Juan Ferrando Dainik Gomantak
क्रीडा

Durand Cup : स्पर्धेतील पंचगिरी निराशाजनक : फेरांडो

Durand Cup : खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत एफसी गोवाचे प्रशिक्षक चिंतित

किशोर पेटकर

पणजी ः कोलकाता (Kolkata) येथे सुरू असलेल्या 130व्या ड्युरँड कप (Durand Cup) फुटबॉल स्पर्धेतील पंचगिरीबद्दल एफसी गोवाचे (FC Goa) प्रशिक्षक हुआन फेरांडो (Juan Ferrando) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दर्जा निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. आभासी पत्रकार परिषदेत स्पॅनिश प्रशिक्षकांनी स्पर्धेतील पंचगिरीवर हल्ला चढविला. फेरांडो म्हणाले, ‘‘ड्युरँड कप ही प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. त्यात भाग घेणे अभिमानास्पद आहे, परंतु पंचगिरीच्या दर्जावर मी नाराज आहे. ते खेळाडूंना संरक्षण देत नाहीत, हे धोकादायक आहे. मागील सामन्यातील सामनाधिकाऱ्यांविषयी मी खूप नाराज आहे. सामन्यानंतर मी सामनाधिकाऱ्यांशी बोललो आणि ते हसत होते. ओर्तिझला झालेली दुखापत गंभीर आहे. हसण्याजोगी निश्चितच नाही. खेळाडूंना सुरक्षा पुरविणे हे त्यांचे काम आहे, पण ते का हसत होते माझ्या समजण्यापलिकडे आहे.’’ एकंदरीत स्पर्धेतील पंचगिरीच्या दर्जाचे फेरांडो खूपच निराश दिसले. आभासी पत्रकार परिषदेत एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनीही भाग घेतला. स्पर्धेत कडवट अनुभव मिळाला असून यासंदर्भात स्पर्धा आयोजकांना लेखी कळविले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी खेळाडूंच्या सुरक्षिततेवर भर दिला. एफसी गोवा संघाने महासंघालाही पत्र लिहिले असून त्यांच्याकडून अजून उत्तर न मिळाल्याबद्दल रवी यांनी खेद व्यक्त केला. ड्युरँड कप स्पर्धेच्या ब गटात दोन्ही सामने जिंकून एफसी गोवा संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला आहे. जमशेदपूर एफसीविरुद्ध त्यांचा शेवटचा साखळी सामना शुक्रवारी खेळला जाईल.

दुखापतग्रस्त ओर्तिझ स्पर्धेबाहेर

एफसी गोवाने मागील लढतीत सुदेवा दिल्ली संघाला नमवून ड्युरँड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, पण संघातील हुकमी स्पॅनिश खेळाडू होर्गे ओर्तिझ याला सामन्याच्या अंतिम टप्प्यात दुखापत झाल्याने मैदान सोडावे लागले. सुदेवा दिल्ली संघाच्या खेळाडूचे टॅकल खूपच धोकादायक ठरले. ओर्तिझविषयी फेरांडो यांनी सांगितले, की ‘‘होर्गेच्या दुखापतीचा आम्ही सध्या अंदाज घेत आहोत. मी जास्त काही सांगू शकत नाही. तो ड्युरँड कप स्पर्धेत खेळू शकणार नाही. स्पर्धेचा दर्जा उंचवायला हवा, त्यासाठी खेळाडूंचे संरक्षण आवश्यक आहे. दुखापत होण्याचा धोका खेळाडूंना जाणवत असल्यास ते स्पर्धेत भाग घेणार नाहीत.’’

भविष्यात स्पर्धेत खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह

एफसी गोवा संघ स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंसह सहभागी झाला. भविष्यात अशाप्रकारच्या स्पर्धांत खेळण्याबाबत आपल्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. खेळाडूंची प्रेरणा आता बदलली आहे, असे मत फेरांडो यांनी व्यक्त केले. स्पर्धेत खेळण्याऐवजी मोसमपूर्व सराव गोव्यातच करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT